ट्रम्प टॅरिफमुळे भारतातील ग्राहकांना मिळणार मोठा फायदा; ‘या’ वस्तू होणार स्वस्त

On: April 11, 2025 11:21 AM
---Advertisement---

अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १२५% कर लादल्यानंतर, अनेक चिनी इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादक कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. भारतीय ग्राहकांना या सवलतीचा थेट फायदा होऊ शकतो. कारण यामुळे स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमती कमी होऊ शकतात

भारतातील ग्राहकांना मिळणार मोठा फायदा

टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन यासारख्या वस्तूंची निर्मिती भारतात होणार आहे. याचा थेट फायदा म्हणजे उत्पादन खर्च कमी होणार, परिणामी भारतीय ग्राहकांना हे उपकरणं स्वस्तात उपलब्ध होतील.

देशांतर्गत स्पर्धेमुळे दर आणखी कमी होण्याची शक्यता

भारतात येणाऱ्या चिनी उत्पादक कंपन्यांना इथल्या बाजारात टिकण्यासाठी देशांतर्गत कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे स्वस्त दर आणि अधिक फिचर्स असलेल्या वस्तू बाजारात येणार आहेत. यामुळे टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोनसारख्या वस्तूंमध्ये पुढील काही महिन्यांत मोठी स्वस्ताई पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

अमेरिकन ऑर्डरमध्ये घट झाल्यामुळे, ते भारतीय कंपन्यांना कमी किमतीत घटक पुरवण्यास तयार आहेत. कंपन्या मे-जूनपासून नवीन ऑर्डर देण्यास सुरुवात करतील, जे २-३ महिन्यांच्या इन्व्हेंटरी सायकलनुसार असतील.

Title: TVs, Fridges, Phones to Get Cheaper Due to Trump Tariff

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now