शासनात सर्वात मोठा दणका! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना तडकाफडकी पदावरून हटवलं

On: June 23, 2026 8:47 PM
Tukaram Mundhe
---Advertisement---

Tukaram Mundhe | राज्यातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागात (FDA) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात भेसळविरोधी कारवायांची मोहीम राबवली आहे. दरम्यान, राज्य सरकारने त्यांच्या अतिरिक्त जबाबदारीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदात बदल करण्यात आला आहे.

परभणीच्या पालक सचिवपदातून मुंढेंची मुक्तता :

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार तुकाराम मुंढे यांना परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या पालक सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मात्र, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून आपली जबाबदारी पूर्ववत सांभाळणार आहेत. यामुळे त्यांच्या सध्याच्या पदावर कोणताही परिणाम झालेला नाही.

यापूर्वी 23 फेब्रुवारी 2026 रोजी तुकाराम मुंढे यांची परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांची बदली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी झाल्यानंतर त्यांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला.

Tukaram Mundhe | डॉ. पुलकुंडवार यांच्याकडे नवा कार्यभार :

राज्य सरकारने परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आता परभणी जिल्ह्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांचा आढावा आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याची जबाबदारी असेल.

याचबरोबर अकोला (Akola) जिल्ह्याच्या पालक सचिवपदातही बदल करण्यात आला आहे. सौरभ विजय (Saurabh Vijay) यांच्या जागी परिमल सिंह (Parimal Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालक सचिव हे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणे, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी तपासणे, अडचणींचे निराकरण सुचवणे आणि शासनाला नियमित अहवाल सादर करणे ही या पदाची प्रमुख जबाबदारी असते. तसेच वर्षातून किमान चार वेळा जिल्हा दौरा करणेही पालक सचिवांसाठी आवश्यक असते.

News Title: Tukaram Mundhe Relieved From Guardian Role

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now