पिंपरी दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

On: May 30, 2026 4:54 PM
Tukaram Mundhe
---Advertisement---

Tukaram Mundhe | पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात विषारी गावठी दारूमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा धागा शोधून काढला असून दारू निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या घातक रसायनाचे भिवंडी (Bhiwandi) कनेक्शन समोर आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात मिथेनॉल जप्त करण्यात आले.

भिवंडीतील कंपनीवर धाड :

विषारी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनाचा पुरवठा भिवंडी येथून झाल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर एफडीएच्या विशेष पथकाने ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ (M/s Rex International) या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत मानवी आरोग्यास अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या मिथेनॉल (Methanol) या रसायनाचा तब्बल 5 हजार 929 किलोचा साठा जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब उघड झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेल्या या रसायनाची कोणतीही अधिकृत नोंद कंपनीच्या रजिस्टरमध्ये आढळली नाही. त्यामुळे या व्यवहारामागे बेकायदेशीर नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. तपास यंत्रणांच्या मते, पुण्यातील विषारी दारू प्रकरणात वापरलेले मुख्य रसायन याच ठिकाणाहून पुरवले गेले होते.

Tukaram Mundhe | विषारी दारूची संपूर्ण साखळी उघड :

एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त चौकशीतून या रसायनाच्या पुरवठ्याची साखळी समोर आली आहे. भिवंडीतील कंपनीकडून बाहेर पडलेले मिथेनॉल हे कर्नालसिंग विरका (Karnal Singh Virka), मुख्य आरोपी योगेश वानखेडे (Yogesh Wankhede) आणि उरळी कांचन (Uruli Kanchan) येथील राजू प्रजापती (Raju Prajapati) यांच्याशी संबंधित साखळीमार्फत पुण्यात पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अधिक नफा मिळवण्यासाठी या घातक रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करण्यात आली आणि ती विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात आली. याच दारूचे सेवन केल्यानंतर 22 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

News Title: tukaram Mundhe Cracks Down On Methanol Network

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now