“तुमच्या लेकींवर अतिप्रसंग व्हायची वाट पाहताय का?”; तृप्ती देसाईंचा सरकारला सवाल

On: February 27, 2025 3:47 PM
Trupti Desai Attack on Government over Swargate rape case
---Advertisement---

Swargate rape case | स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी सरकार आणि पोलिसांवर थेट हल्लाबोल केला आहे. (Swargate rape case)

“राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली जात आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरण असो किंवा स्वारगेट प्रकरण, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? गाडे (Dattatray Gade) सरेंडर होण्याची वाट पाहताय का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“महिला रात्रभर जाग्या आहेत, पण सरकार निष्क्रिय!”

तृप्ती देसाईंनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “आज महाराष्ट्रातील महिला रात्रभर जाग्या आहेत. आपल्या लेकीबाळींवर अशी वेळ येऊ नये म्हणून त्या घाबरल्या आहेत. पण सरकार आणि पोलीस काहीच करत नाहीत. तुम्हीही महिला कॉन्स्टेबल आहात ना, आपल्या मुलीवर अतिप्रसंग होण्याची वाट पाहताय का?”

तृप्ती देसाईंनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या पुढे म्हणाल्या, “मला जबरदस्तीने ओढून नेलं, पण आरोपीला ओढून का नेत नाही? जर तुम्हाला आरोपीला अटक करता येत नसेल, तर तो आमच्या ताब्यात द्या, आम्ही निकाल लावतो. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातोय की पळवला जातोय?”

सरकारवर तीव्र टीका, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

स्वारगेट प्रकरणाच्या तपासावरुन पोलीस प्रशासन आणि सरकारवर टीका वाढत आहे. “राजकीय दबावामुळेच अनेक गुन्हेगार मोकाट सुटतात,” असा गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना सरेंडर करण्याची संधी दिली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणातही तसंच घडणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. (Swargate rape case)

महिलांची सुरक्षा ही केवळ चर्चेचा विषय राहणार की सरकार ठोस कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 Title :  Trupti Desai Attack on Government over Swargate rape case

 

Join WhatsApp Group

Join Now