Traffic Jam l अवजड मालवाहू (Heavy Goods Vehicles) वाहनांव्यतिरिक्त (Except) इतर सर्व वाहनांचा टोल (Toll) माफ होऊनही दहिसर टोलनाक्यावर (Dahisar Toll Plaza) वाहतूक कोंडी (Traffic Jam) कायम आहे. कोंडी दूर करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांचा पारा चढला.
दहिसर टोलनाक्याची सरनाईकांकडून पाहणी
दहिसर टोलनाका येथे टोल माफ झाला तरी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. टोलनाका येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या गुरुवारी मंत्री सरनाईक यांनी महापालिका (Municipal Corporation), पोलिस (Police), आरटीओ (RTO) व टोलनाका अधिकारी यांच्यासह पाहणी केली होती.
Traffic Jam l हलक्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्याचे निर्देश:
त्यावेळी त्यांनी तातडीने रस्त्यावरील मुंबईकडे (Mumbai) जाताना केवळ 3 व येताना 2 रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात.
उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूंनी 500 मीटरपर्यंत लावण्यात यावेत.
वाहनधारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल आणि वाहतूक कोंडी सुटेल, असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले होते.
शनिवारपर्यंतची दिली शेवटची मुदत:
“आपण आधी शिवसैनिक (Shiv Sainik) असून नंतर मंत्री आहोत, असे सांगत शनिवारपर्यंत सूचना अमलात आणल्या नाहीत तर आपण स्वतः टोलनाका फोडून टाकू,” असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.
कारवाईचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेट:
सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी पुन्हा टोलनाक्याची पाहणी करून ठेकेदाराने काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला. यावेळी आरटीओचे मंगेश गुरव (Mangesh Gurav), मुंबई वाहतूक शाखेचे प्रमोद तावडे (Pramod Tawde) व मीरा-भाईंदर वाहतूक शाखेचे सागर इंगोले (Sagar Ingole) आदी उपस्थित होते.








