तुमच्या बजेटमधील फॅमिली हॉलिडे! एप्रिलमध्ये ‘या’ ५ सुंदर ठिकाणी अनुभवा अविस्मरणीय क्षण

On: April 18, 2025 7:20 AM
Top 5 Summer Travel India Destinations
---Advertisement---

Summer Travel India | एप्रिलमध्ये सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो आणि परीक्षा संपल्यामुळे अनेक कुटुंबं फिरण्याचा बेत आखतात. मात्र नेमकं कुठे जायचं हे ठरवताना गोंधळ होतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास ५ अशा पर्यटनस्थळांची यादी घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही एप्रिलमध्ये कुटुंबासोबत जाऊन एक अविस्मरणीय सहल अनुभवू शकता. (Summer Travel India )

तवांग 

अरुणाचल प्रदेशामधील २,६६९ मीटर उंचीवर वसलेलं तवांग हे उत्तर-पूर्व भारतातील एक अप्रतिम डोंगराळ ठिकाण आहे. बर्फाच्छादित हिमालय पर्वतरांगा, दाट जंगलं, स्वच्छ निळे तलाव आणि बौद्ध धर्माच्या संस्कृतीने नटलेले मठ यामुळे तवांग हे सर्व वयोगटातील पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण ठरतं. साहसप्रेमींसाठी ‘ताशी डेलेक’ ट्रेकसारखा अनुभवही येथे घेता येतो.

पचमढी  

मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं पचमढी हे राज्यातील एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवळ, धबधबे आणि प्राचीन गुहा यांचं मिश्रण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी. धबधब्यांखाली बसून निसर्ग अनुभवायचा किंवा प्राचीन लेण्यांमध्ये फिरत इतिहास समजून घ्यायचा – दोन्हींची मजा येथे घेता येते. ट्रेकिंग आणि हायकिंगसाठीही हे ठिकाण उत्तम आहे.

धर्मशाळा  

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा हे तिबेटी संस्कृतीने भारलेलं पर्यटनस्थळ आहे. इथे भेट दिल्यावर तिबेटी जीवनशैली, रंगीबेरंगी झेंडे आणि भव्य मठ हे सगळं डोळ्यांत भरतं. धर्मशाळानजीकचं मॅक्लोडगंज हे ठिकाणही डोंगराच्या कुशीत वसलेलं असून, तेथील हवामान आणि निसर्गरम्य दृश्ये मनाला शांती देतात.

उटी 

तमिळनाडूमधील उटी हे दक्षिण भारतातील एक प्रसिध्द हिल स्टेशन आहे. एप्रिलमध्ये येथे हवामान आल्हाददायक असतं आणि पर्यटनासाठी योग्य काळ मानला जातो. उटीतील टायगर हिल, दोडाबेट्टा शिखर, निळसर तलाव आणि उंचावरून दिसणाऱ्या चहाच्या बागा हे सारे नजारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भुरळ घालतील.

दार्जिलिंग 

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे एक प्रसिद्ध डोंगराळ पर्यटनस्थळ असून एप्रिल महिन्यातील थंड हवामान आणि निसर्गाची साथ यामुळे हे ठिकाण अधिकच सुंदर वाटतं. येथे तुम्ही टॉय ट्रेनची सफर करू शकता, टायगर हिलवरून सूर्योदय पाहू शकता आणि शांततामय चहाच्या बागांमध्ये फिरून विश्रांती घेऊ शकता. गारव्यासाठी हलकी उबदार कपड्यांची तयारी करून जाणं आवश्यक आहे.

Title : Top 5 Summer Travel India Destinations in April

 

Join WhatsApp Group

Join Now