सतर्क! आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

On: August 9, 2024 11:32 AM
Weather Updates
---Advertisement---

Weather Updates l महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD) आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा :

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या महिन्यात राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटलेली दिसून येत आहे. तसेच पुणे शहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्यापूर्वीच येथे जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.

Weather Updates l पुण्याची ही धरणे ओव्हर फ्लो :

पुणे- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ७.९७ टीएमसी (९३.६४ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कलमोडी, आंध्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय पेडगाव, डिंबे, चासकमान, भामा आसखेड, वाडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नीरा देवघर, वीर ही धरणेही काठोकाठ भरल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली आहेत. अशा स्थितीत मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता संपली आहे. अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेल्या चार धरणांमध्ये तानसा धरण, मोडकसागर धरण, भातसा धरण आणि वैतरणा धरणाचा समावेश आहे.

News Title- Today Maharashtra Weather Updates

महत्वाच्या बातम्या-

नागपंचमी सणाला नागदेवतांची पूजा ‘या’ वेळेपर्यंत करा; मिळतील शुभ संकेत

नागदेवता या दोन राशींवर होणार प्रसन्न; मिळणार आनंदाची बातमी

कायम पैशांच्या मागे पळणं सोडा, आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा!

समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now