Today Horoscope | आज 8 एप्रिल 2025 रोजी कामदा एकादशीच्या निमित्ताने चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी शूल योग, आश्लेषा व मघा नक्षत्र तसेच विशिष्ट राहूकाळ पाहायला मिळणार आहे. या आध्यात्मिक दिवशी प्रत्येक राशीच्या व्यक्तींना वेगवेगळे लाभ होणार आहेत. (Today Horoscope)
आजएकादशीची तिथी रात्री 9:14 वाजेपर्यंत असणार आहे. दिवसाची सुरुवात आश्लेषा नक्षत्राने होणार असून सकाळी 7:55 नंतर मघा नक्षत्र सुरू होईल. शूल योग सकाळी 6:09 वाजेपर्यंत आहे, जो दिवसभरातील निर्णयांवर परिणाम करू शकतो. याशिवाय राहूकाळ दुपारी 3 ते 4:30 या वेळेत राहील. या दिवसाचे विशेषत्व म्हणजे कामदा एकादशीचा योग, जो भगवान विष्णूच्या उपासनेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असून काही राशींना या निमित्ताने विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
आजचे राशीभविष्य
मेष (Aries)
या राशीच्या लोकांना जास्त श्रमाचा अनुभव येईल, पण अधिकारांचा योग्य उपयोग करता येईल.
वृषभ (Taurus)
या राशीच्या व्यक्तींना घरगुती गडबडीत दिवस जाईल, परंतु सामाजिक कामात सहभाग लाभेल.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांनी गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे.
कर्क (Cancer)
या राशीसाठी अडथळ्यांवर मात करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस तणावात जाऊ शकतो.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांना कामानिमित्त प्रवास करून मान सन्मान प्राप्त होईल. दिवसाच्या शेवटी शुभवार्ता मिळेल.
कन्या (Virgo)
या राशीने मानसिक स्वास्थ्यावर भर द्यावा आणि जोडीदाराच्या मताला महत्त्व द्यावे.
तूळ (Libra)
या राशीसाठी आजचा दिवस लॉटरीसारख्या गोष्टीत लाभदायक ठरू शकतो, तसेच नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या व्यक्तींनी घरगुती वातावरणाचा आनंद घ्यावा आणि नवीन व्यवसाय योजनेवर विचार करावा.
धनू (Sagittarius)
या राशीला ध्यानधारणेतून ताणमुक्ती मिळेल, तसेच कौटुंबिक सौख्य मिळेल.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांनी धार्मिक व कौटुंबिक विचारांना प्राधान्य द्यावे.
कुंभ (Aquarius)
या राशीचे लोक आज स्वतःच्या इच्छेनुसार काम करतील आणि आरोग्यात सुधारणा अनुभवतील.
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांना नवीन गोष्टींमध्ये रस निर्माण होईल आणि कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल.
Title : Today Horoscope Kamada Ekadashi 8 april 2025






