आजचे राशीभविष्य 5 मे 2025 : सोमवारी भोलेनाथ कोणत्या राशीवर राहणार मेहेरबान?, वाचा राशीभविष्य

On: May 5, 2025 7:30 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope | आज ५ मे २०२५, सोमवारी आश्लेषा नक्षत्र आणि वृद्धि योगाचा संगम घडत असून, काही राशींना आज धनलाभ, तर काहींना वैयक्तिक नात्यांमध्ये समाधान मिळेल. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीसाठी दिवस कसा जाईल, पाहुयात- (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य 

मेष:
मेष जातकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्य वाढवणारा ठरेल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल. मेहनतीचं योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, त्यामुळे तयारी ठेवावी. खर्चात वाढ होईल, पण मनातील एक महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल.

वृषभ:
काम आणि वेळेचं योग्य नियोजन आज आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचा वेळीच अंदाज घेणं फायदेशीर ठरेल. तुमच्यात नवीन विचारांचे बीज रोवले जाईल. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता असून त्यातून नवीन दिशा मिळेल. तुमचा दृष्टिकोन आज सकारात्मक ठेवा.

मिथुन:
काही गोष्टी लपवण्याकडे तुमचा कल राहील, मात्र आज पारदर्शक राहणं योग्य ठरेल. फसवणुकीपासून सावध राहणं गरजेचं आहे. मनातील निराशा दूर करा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवा. वरिष्ठांशी वागताना सतर्क राहा.

कर्क:
तुमच्या घरामध्ये प्रतिष्ठित लोकांचे आगमन होऊ शकते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. मित्रांची मदत कामात उपयोगी पडेल. स्त्रियांच्या मदतीने काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. (Today Horoscope)

सिंह:
तुमची कला लोकांसमोर प्रभावीपणे सादर करता येईल. सरकारी कामात यश मिळेल. मध्यस्थीच्या कामातून फायदा होईल. जोडीदाराच्या मताला महत्त्व द्यावं. छोट्या गोष्टींवर मनस्ताप न करता संयम बाळगावा.

कन्या:
मानसिकदृष्ट्या आज तुमच्यावर ताण राहू शकतो. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. चुगलखोरी करणाऱ्यांपासून अंतर ठेवणं फायद्याचं ठरेल. नातेवाईकांसाठी तुम्हाला मदतीचा हात पुढे करावा लागेल. वादविवाद टाळा.

तूळ:
योग्य संधीची वाट पाहत राहा. काही कामांमध्ये अडथळे येतील, परंतु संयम ठेवा. मुलांचे हट्ट पूर्ण करावे लागतील. आज थोडासा चिडचिडेपणा जाणवेल. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा, नातेसंबंध सुधारण्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक:
भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास प्रवास टाळावा. पत्नीचं वर्चस्व जाणवेल, पण समजून घ्या. वैचारिक पातळीवर लवचिकता दाखवा. आपल्या मतांवर अती आग्रह धरू नका.

धनू:
छोट्या प्रवासात काळजी घेणं आवश्यक आहे. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. आरोग्य सुधारेल. नातेवाईक वेळच्या वेळी मदतीला येतील. मात्र, भावंडांशी मतभेद होऊ शकतात.

मकर:
जोडीदाराचं वागणं हट्टी वाटू शकतं, पण त्यामागची भूमिका समजून घ्या. नवीन मित्र जोडले जातील. घरगुती विषयांवर तुम्ही ठाम मत मांडाल. संयम राखा, हेच यशाचं सूत्र आहे. (Today Horoscope)

कुंभ:
स्वतःचीच मते खूप पुढे रेटाल, पण इतरांचंही ऐका. रागावर नियंत्रण ठेवा. क्षुल्लक गोष्टीमुळे चिडचिड होऊ शकते. पण, स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.

मीन:
नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळेल. कोणत्याही वादात थेट उडी घेऊ नका. काही त्रासांचे मूळ कारण तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. बदलांवर लक्ष ठेवा आणि ते स्वीकारा.

Title: Today Horoscope 5 May 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now