आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

On: October 30, 2024 8:05 AM
Today Horoscope 30 October
---Advertisement---

Today Horoscope | आज 30 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी बुधवारी दुपारी 1 वाजून 16 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. तसेच, आज राहू काळ दुपारी 12 वाजता सुरु होईल ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज मासिक शिवरात्रीही साजरी करण्यात येणार आहे. आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष रास : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल. आज घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

वृषभ रास : आज तुम्हाला राजकारणात पाठिंबा आणि मोठी संधी मिळेल. कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा. आलेल्या संधीचा लाभ घ्या.

मिथुन रास : मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope)

कर्क रास : आज तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल. सहकारी वर्गासोबत वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह रास : आज तुमचा दिवस उत्साही जाईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे. जोडीदारासोबतचे बिघडलेले संबंध सुधारतील.

कन्या रास : व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी राहतील. अडचणीतून मार्ग काढता येईल.

तूळ रास : नोकरी संबंधी तुम्हाला आज नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. (Today Horoscope)

वृश्चिक रास : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. आज जवळचा प्रवास योग देखील आहे.

धनू रास : पैशांशी संबंधित तुमचे काम आज मार्गी लागेल. आज गोड पदार्थावर ताव माराल. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.

मकर रास : दिवाळीच्या या दिवसांत तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील. तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतील. अचानक तुम्हाला धनलाभ होईल. ही दिवाळी तुमच्यासाठी अत्यंत खास ठरेल. (Today Horoscope)

कुंभ रास : आज तरुण वर्गाला चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. आज भाग्याची साथ मिळेल.

मीन रास : रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या समस्या देखील दूर होतील.

News Title – Today Horoscope 30 October 

महत्त्वाच्या बातम्या-

“मी सिंगल…”, अर्जून कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल सर्वात मोठा खुलासा!

“जगून काय फायदा म्हणून त्यांनी असं..”, श्रीनिवास वनगांच्या बायकोने शिंदेंवर केला गंभीर आरोप

ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारण आलं समोर

खुशखबर! ‘या’ बँकांकडून मिळतंय सर्वात स्वस्त होम लोन

शरद पवारांनी भरसभेत केली अजित पवारांच्या रडण्याची नक्कल!

Join WhatsApp Group

Join Now