‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

On: May 22, 2024 8:33 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल. शुभ अंक ६, शुभ रंग गुलाबी

वृषभ:- कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

मिथुन:- भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा. शुभ अंक ५, शुभ रंग विटकरी

कर्क:- फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल. शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा

सिंह:- काहीसे धोरणीपणे  वागाल. अडचणीवर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. अचानक धनलाभ संभवतो. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

कन्या:- धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी

तूळ:- जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस. शुभ अंक ३,  शुभ रंग पांढरा

Today Horoscope l वृश्चिक:- भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या  मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होऊ शकते. शुभ अंक १, शुभ रंग लाल

धनू:- बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. शुभ अंक ५, शुभ रंग निळा

मकर:- मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा

कुंभ:- सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा

Today Horoscope l मीन:- व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले

हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर

सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

‘…तर सगळे पब, बार बंद करा’; देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now