आजचे राशीभविष्य 15 मार्च 2025 : बुधाचे राशी परिवर्तन ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!

On: March 15, 2025 7:16 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope | आज 15 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. ही तिथी दुपारी 2:34 पर्यंत राहील. सकाळी 8:54 पर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र प्रभावी राहील, त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल. आजचा राहू काळ 9:30 ते 10:30 या वेळेत राहणार आहे. शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 दरम्यान असेल. याशिवाय, दुपारी 12:16 वाजता बुध मीन राशीत वक्री होणार आहे. याचा फायदा काही राशीला होणार आहे, आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहुयात. (Today Horoscope)

मेष ते कन्या राशीभविष्य

मेष (Aries): मानसिक चंचलता जाणवेल. लहान मुलांमध्ये रमाल. अभ्यासू लोकांमध्ये तुमची ओळख निर्माण होईल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

वृषभ (Taurus): काही तात्पुरत्या फायद्यांचा लाभ घ्याल. स्त्रियांशी चांगले संबंध राहतील. मोठ्या व्यक्तींच्या सहवासाचा फायदा मिळेल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. आदर आणि पैसा कमवाल.

मिथुन (Gemini): कामात गोंधळ जाणवेल. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाकांक्षा वाढेल. प्रयत्नशील राहावे लागेल. समाजात तुमचा दर्जा उंचावेल.

कर्क (Cancer): जोडीदाराच्या विचारांमध्ये ठामपणा जाणवेल. काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य कराव्या लागतील. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या मतांशी मतभेद संभवतात. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न कराल.

सिंह (Leo): आरोग्याकडे लक्ष द्यावे. उष्णतेचे विकार होऊ शकतात. पत्नीचा संयमी स्वभाव जाणवेल. कामाच्या व्यावहारिक बाजू समजून घ्याव्यात. छुप्या शत्रूंचा विरोध कमी होईल. (Today Horoscope)

कन्या (Virgo): मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल. कामात चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संपर्काचा योग्य वापर करावा.

तूळ ते मीन राशीभविष्य

तूळ (Libra): प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती समजून घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाचनाची आवड जोपासाल.

वृश्चिक (Scorpio): कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. व्यवसाय विस्तार वाढवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. प्रवासात सतर्क राहा. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल.

धनू (Sagittarius): अनावश्यक काळजी करू नका. कामातील अडथळे प्रयत्नांनी दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागू शकतो. खर्च नियंत्रित ठेवा. जबाबदारीने निर्णय घ्या.

मकर (Capricorn): आत्मविश्वास गमावू नका. काही निर्णय ठामपणे घ्यावे लागतील. कामात उत्साह आणि चिकाटी वाढवा. गोड बोलून कामे करून घ्याल. अधिकाराचा योग्य वापर कराल. (Today Horoscope)

कुंभ (Aquarius): सर्व गोष्टींमध्ये तत्परता दाखवाल. भावना स्पष्टपणे मांडाल. हसतमुख राहून कामे पूर्ण कराल. हटवादीपणा टाळा. अनावश्यक विचार करू नका.

मीन (Pisces): मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. कामाची मर्यादा ओळखा. काटकसर करण्याचा विचार करा. दिखाऊपणा टाळा. शांतपणे योग्य निर्णय घ्या.

Title : Today Horoscope 15 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now