शुक्राचा मीनमध्ये प्रवेश! आजपासून नशीब पालटणार, शुक्राच्या प्रभावाने ‘या’ राशी होणार मालामाल

On: April 14, 2025 7:01 AM
Gajakesari Rajyog 2025
---Advertisement---

Today Horoscope | आज१४ एप्रिल २०२५ रोजी शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे अनेक राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. काही राशींना प्रेम, पैसा आणि यश प्राप्त होणार असून काहींना सतर्क राहण्याची गरज आहे. आजचा दिवस कोणासाठी शुभ असेल आणि कोणासाठी सावधगिरी आवश्यक आहे, हे जाणून घेऊया. (Today Horoscope)

आजचे पंचांग

१४ एप्रिल २०२५ या दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सकाळी ८.२६ वाजेपर्यंत राहणार असून त्यानंतर द्वितीया तिथी लागेल. स्वाती नक्षत्र रात्री १२.१४ वाजेपर्यंत प्रभावी राहील आणि वज्र योग रात्री १०.३८ वाजेपर्यंत स्थिरावेल. याशिवाय राहू काळ सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत असेल. याच दिवशी शुक्र ग्रह सकाळी ६.३४ वाजता मीन राशीत प्रवेश करेल, ज्याचा परिणाम विविध राशींवर होणार आहे.

आजचे राशीभविष्य 

मेष (Aries)

राशीच्या लोकांना आज त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लोक आकर्षित होतील. सरकारी कामकाजात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल जाणवतील आणि मौल्यवान वस्तू जपून ठेवण्याची गरज भासेल. तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्याचा योग येईल.

वृषभ (Taurus)

लोक आज जीवनाकडे आनंददायी दृष्टीने पाहतील. साहित्यवाचनाची आवड वाढेल. भावंडांना प्रवासाची संधी मिळेल. मैत्रीत प्रेम वाढेल. फार दूरचे विचार न करता सध्याचा काळ अनुभवण्यात आनंद घ्यावा.

मिथुन (Gemini)

व्यक्तींना तात्पुरत्या सुखाचा अनुभव येईल. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगतीचा मार्ग सापडेल. व्यापाऱ्यांना नफा मिळेल आणि कमिशनच्या माध्यमातून फायदा होईल.

कर्क (Cancer)

लोकांना स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. वाहन सुखाचा आनंद घेता येईल. मुलांच्या आनंदामुळे मन प्रसन्न होईल. (Today Horoscope)

सिंह (Leo)

राशीचे लोक घरासाठी सजावटीची वस्तू खरेदी करतील. त्यांच्या कलेचे कौतुक होईल. महिलांना आवडती खरेदी करता येईल. वाचनात चांगले साहित्य हाताशी येईल. जोडीदाराचे सुस्वभावी वागणे जाणवेल.

कन्या (Virgo)

राशीच्या लोकांना त्यांच्या कलेसाठी वाव मिळेल. योग्य विचारांच्या साथीने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. धार्मिक ग्रंथाचे वाचन होतील. इतरांना मदत करण्याची भावना जागृत होईल. नवकल्पना मनात रुजतील.

तूळ (Libra) 

राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीतही यश मिळू शकते. घरगुती प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. पचनसंस्थेची काळजी घ्यावी. हातातील प्रलंबित कामे पूर्ण होतील.

वृश्चिक (Scorpio)

लोकांना पत्नीचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. कामातून मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात विस्तारासाठी योजना आखाल. मुलांच्या खोड्यामुळे थोडी झोपमोड होईल.

धनू (Sagittarius)

या राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील खर्च पुन्हा मांडावा लागेल. मित्रांची संगत लाभेल. बोलण्याच्या ओघात नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या जातील. सहकाऱ्यांकडून कामे करून घेण्यात यश मिळेल. जुगाराची आवड दिसून येईल.

मकर (Capricorn)

लोकांना पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कामाचा ताण घेऊ नये. नातेवाईकांशी वाद उद्भवू शकतो. स्वतःमध्ये बदल करून पाहणे योग्य ठरेल. अडचणींवर प्रयत्नपूर्वक मात करता येईल.

कुंभ (Aquarius)

राशीच्या लोकांनी सामाजिक जबाबदारी पाळावी. वादविवाद टाळावेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. धाडसाने काम पूर्ण करता येईल. तुमची आत्मविश्वासाची पातळी वाढेल.

मीन (Pisces)

राशीच्या लोकांनी मित्रांशी वाद टाळावा. वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल. मुलांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. जमीन संबंधित व्यवहारातून लाभ संभवतो. मानसिक अस्थिरता जाणवेल.

Title : Today Horoscope 14 April  2025 

 

Join WhatsApp Group

Join Now