Today Horoscope | आज 11 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. सकाळी 8:15 पर्यंत द्वादशी तिथी असून त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. या दिवशी दुपारी 2:16 वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जुळून येईल. आश्लेषा नक्षत्रही याच वेळेपर्यंत प्रभावी राहणार आहे. तसेच, हा दिवस मार्च महिन्यातील पहिला आणि मराठी वर्षातील शेवटचा भौम प्रदोष व्रत असणार आहे, जो महादेवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे, या दिवशी काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. (Today Horoscope)
आजचे राशीभविष्य
मेष (Aries): आजच्या दिवशी तुमच्यात काहीसा हटवादीपणा दिसून येईल. कामात गती येईल, पण स्वतःविषयी गैरसमज निर्माण होऊ नयेत, याची काळजी घ्या. परिस्थितीनुसार वागणे योग्य ठरेल.
वृषभ (Taurus): तुमच्या स्वभावात थोडा कर्मठपणा दिसेल. वडिलांचा सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या. नवीन विचार आत्मसात करण्याची गरज आहे. तुमची न्यायप्रिय वृत्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.
मिथुन (Gemini): प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक तणाव टाळा.
कर्क (Cancer): संयम आणि शांत विचाराने निर्णय घ्या. जोडीदाराच्या मताचा आदर करा. घराच्या सजावटीवर लक्ष केंद्रित कराल. भावंडांच्या मदतीसाठी तयार राहावे लागेल.
सिंह (Leo): काही चुकीच्या लोकांमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. सर्दी-खोकल्यासारख्या किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही गैरसमजुतीला मोठा वाद होऊ देऊ नका.
कन्या (Virgo): मनातील शंका दूर ठेवा. प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवल्यास फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या मदतीमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. (Today Horoscope)
तूळ (Libra): घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. नातेवाईकांची मदत घेणे गरजेचे ठरू शकते. प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालवा.
वृश्चिक (Scorpio): आर्थिक बाबतीत दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. काही नवीन अधिकार मिळू शकतात. कौटुंबिक खर्च मात्र वाढू शकतो.
धनू (Sagittarius): मोठ्या बदलांसाठी योग्य वेळ आहे. घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात. कोणत्याही वादात अडकू नका.
मकर (Capricorn): जुन्या गोष्टींवर फार अवलंबून राहू नका. छुप्या शत्रूंपासून सावध राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अडथळे दूर होतील. (Today Horoscope)
कुंभ (Aquarius): कोणाशीही अनावश्यक वैर पत्करू नका. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन (Pisces): मानसिक ताण जाणवेल, त्यामुळे शांत राहा. कामाच्या विलंबावर लक्ष ठेवा. तुमचे गुण आणि कौशल्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
Title : Today Horoscope 11 March 2025






