या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील

On: May 9, 2024 7:32 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अतिविचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी

वृषभ:- जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. शुभ अंक १ , शुभ रंग जांभळा

मिथुन:- चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील. शुभ अंक ९, शुभ रंग लाल

कर्क:- मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

सिंह:- आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

कन्या:- प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ६, शुभ रंग पिवळा

तूळ:- बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक १, शुभ रंग निळा

Today Horoscope l वृश्चिक:- आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल. शुभ अंक 5, शुभ रंग गुलाबी

धनू:- मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

मकर:- जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ५, शुभ रंग लाल

कुंभ:- नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी. शुभ अंक ९, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l मीन:- चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. शुभ अंक १, शुभ रंग नारंगी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”

टी 20 विश्वचषकआधी पाकिस्तानातून धमकी; ‘त्या’ फोनने एकच खळबळ

कंगना म्हणते ‘बिग बी नंतर मलाच जास्त मान’, प्रसिद्ध अभिनेत्याला हसू आवरेना

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार, पंजाब डख यांचा अंदाज

‘…तर मी मिशा ठेवणार नाही’; गुणरत्न सदावर्तेंनी दिलं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now