या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत

On: June 7, 2024 7:33 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

वृषभ:- वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल. शुभ अंक ८, शुभ रंग हिरवा

मिथुन:- जोडीदाराविषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका. शुभ अंक २, शुभ रंग निळा

कर्क:- तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी

सिंह:- वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. जुगारापासून दूर राहावे. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. शुभ अंक ८, शुभ रंग लाल

कन्या:- मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे. शुभ अंक ६, शुभ रंग काळा

तूळ:- जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अतीअपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल. शुभ अंक १, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l धनू:- आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. शुभ अंक ३, शुभ रंग विटकरी

मकर:- मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस. शुभ अंक ४, शुभ रंग पोपटी

कुंभ:- डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अतीघाई बरी नाही. शुभ अंक ७, शुभ रंग पांढरा

Today Horoscope l मीन:- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल. शुभ अंक ९, शुभ रंग लाल

News Title – Today Horoscope 

महत्त्वाच्या बातम्या

“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’

‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा

“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”; पुण्यात जोरदार घोषणाबाजी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now