‘जंतर-मंतरवरील आंदोलकांना आम्ही चोपणार!’, हिंदुत्ववादी संघटनेच्या धमकीने खळबळ

On: July 24, 2026 5:47 PM
NEET Protest
---Advertisement---

NEET Protest | दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनादरम्यान नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदू रक्षा दल या संघटनेचे प्रमुख पिंकी चौधरी (Pinky Chaudhary) यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत 26 जुलै रोजी आंदोलनस्थळी जाण्याची घोषणा केली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आंदोलनावरून तणाव वाढण्याची शक्यता :

अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू असून, नीट पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गाझियाबाद येथील हिंदू रक्षा दलचे प्रमुख पिंकी चौधरी यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जंतर-मंतर येथे पोहोचून आंदोलनकर्त्यांना मारहाण करण्याची घोषणा केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोषणेमुळे 26 जुलै रोजीच्या परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या पिंकी चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांवर भारताची प्रतिमा खराब करण्याचा, सनातन धर्माविरोधात बोलण्याचा, भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा तसेच अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे. या आरोपांच्या आधारे त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विरोध करण्याचा इशाराही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनाभोवतीचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NEET Protest | सोशल मीडियावरील व्हिडिओतून भूमिका स्पष्ट :

पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांवर विविध आरोप करत जंतर-मंतरवरील आंदोलन हे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला. तसेच आंदोलनादरम्यान काही सहभागींकडून सनातन धर्म, भारतीय सैन्य आणि सामाजिक मूल्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याच व्हिडिओमध्ये पिंकी चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काही राजकीय पक्ष आणि नेत्यांचाही उल्लेख केला. त्यांनी समाजवादी पक्ष (Samajwadi Party), काँग्रेस (Congress), आझाद समाज पक्ष (Azad Samaj Party) तसेच खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरही टीका केली. याशिवाय आंदोलनात शरजील इमाम (Sharjeel Imam) आणि उमर खालिद (Umar Khalid) यांच्यासारख्या व्यक्ती सहभागी असल्याचा दावा करत, भारताची प्रतिमा खराब होऊ देणार नसल्याचे आणि आंदोलनाला पूर्ण ताकदीने विरोध करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

News Title: Threat Escalates Jantar Mantar Protest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now