कोल्ड्रिंक पितायं?, तर वेळीच सावध व्हा, डॉक्टरांनी दिला इशारा

On: April 17, 2025 2:05 PM
Health Update
---Advertisement---

Cold Drink Dangers | उन्हाळा तापत चाललेला असताना अनेक जण तहान भागवण्यासाठी थेट कोल्ड्रिंक पिताना दिसतात. थंडावा मिळवण्यासाठी हे सर्रासपणे केलं जात असलं, तरी ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिला आहे.

उन्हाच्या तीव्रतेत (summer heatwave) शरीराला सतत पाण्याची गरज असते. अनेकदा शेतात काम करताना, प्रवासात किंवा बाहेर असताना पाण्याऐवजी लोक कोल्ड्रिंकला पर्याय मानतात, पण ही मोठी चूक आहे. कोल्ड्रिंक तात्पुरती तहान भागवते, पण काही वेळातच ती तहान पुन्हा वाढवते, असं डॉक्टर सांगतात.

कोल्ड्रिंकमुळे डिहायड्रेशनचा धोका :

डॉक्टरांच्या मते, कोल्ड्रिंक्समध्ये (Cold Drink Dangers) असणारा साखरेचा आणि केमिकल्सचा अतिरेक शरीरातील पाणी शोषून घेतो. यामुळे शरीर हायड्रेट होण्याऐवजी डिहायड्रेट होऊ शकतं. शिवाय वारंवार कोल्ड्रिंक पिल्यास पचनसंस्था, लिव्हर आणि हृदयावरही परिणाम होतो.

विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी कोल्ड्रिंकपासून (Cold Drink Dangers) पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. त्याऐवजी नैसर्गिक आणि पोषणमूल्य असणारे पदार्थ निवडावेत, असं डॉक्टरांचं मत आहे.

Cold Drink Dangers | तहान भागवण्यासाठी पर्याय काय?:

जर पाणी सहज उपलब्ध नसेल, तरी अनेक पर्याय तुमचं शरीर हायड्रेट ठेवू शकतात:

नारळ पाणी: इलेक्ट्रोलाईट्सने भरलेलं आणि नैसर्गिक थंडावा देणारं.

उसाचा रस: उष्णतेत ऊर्जादायक आणि तहान भागवणारा.

लस्सी, ताक: पचनास मदत करणारे आणि हायड्रेट ठेवणारे.

थंड दूध, पन्हं: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावणारे नैसर्गिक उपाय.

पाणीदार फळं: काकडी, टरबूज, खरबूज हे फळं केवळ तहानच नाही तर भूकही भागवतात.

ज्येष्ठमध: नैसर्गिक थंडावा देणारी औषधी वनस्पती.

उन्हाळ्यात प्रत्येकाने किमान ८ ते १० ग्लास पाणी दररोज पिण्याची सवय ठेवावी. याशिवाय नैसर्गिक द्रवांचे सेवन वाढवावे. तहान लागली की लगेच (Cold Drink Dangers) कोल्ड्रिंकचा विचार करणं टाळावं. तसेच उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी हायड्रेशन अत्यंत आवश्यक आहे.

News Title: Think Before Drinking Cold Drinks This Summer – Doctors Reveal the Hidden Dangers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now