गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! ‘या’ ३ बँका देतायेत ८ टक्क्यांपर्यंत व्याज

On: December 6, 2025 5:50 PM
FD Interest Rate
---Advertisement---

FD Interest Rate | महाराष्ट्रासह देशभरातील गुंतवणूकदारांसाठी सध्या फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच (Fixed Deposit) सुरक्षित परताव्याचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर जोखीम कमी आणि परतावा निश्चित हवा असेल, तर एफडी हा अनेकांचा पहिला पसंतीचा पर्याय ठरतो. अशातच काही स्मॉल फायनान्स बँकांनी पाच वर्षांच्या कालावधीवर आकर्षक व्याजदर जाहीर केले असून त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.

सध्या काही बँका 60 वर्षांखालील सामान्य नागरिकांसाठी पाच वर्षांच्या एफडीवर तब्बल ८% पर्यंत व्याजदर देत आहेत. इतका जास्त व्याजदर मागील काही महिन्यांपासून क्वचितच दिसला होता. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. या व्याजदरासाठी एफडीची कमाल मर्यादाही साधारण ₹3 कोटी निश्चित करण्यात आली आहे.

कुठल्या बँका देत आहेत सर्वाधिक FD व्याजदर? :

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) ही सध्या पाच वर्षांच्या एफडीवर ८% व्याजदर देणाऱ्या बँकांपैकी प्रमुख बँक आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुंतवणूकदारांना एवढे उच्च व्याज मिळत असल्याने या बँकेच्या एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) देखील एवढाच ८% व्याजदर उपलब्ध करून देते. स्थिर रिटर्न शोधणाऱ्या लोकांसाठी हा दर स्पर्धात्मक असून पाच वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा मिळू शकतो. (Small Finance Bank FD)

FD Interest Rate | उज्जीवन बँकेचा व्याजदर आणि TDS कसा कापला जातो? :

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) सध्या पाच वर्षांच्या एफडीवर ७.२% व्याजदर देत आहे. इतर दोन बँकांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी बाजारातील सर्वसाधारण व्याजदरांच्या तुलनेत तो चांगला मानला जातो.

एफडीवरील व्याजावर TDS कधी कापला जातो? तर, एखाद्या बँकेत गुंतवलेल्या एफडीवर एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज ₹1 लाखांपेक्षा जास्त झाले, तर बँक स्रोतावर कर वजावट (TDS) करते. हा अतिरिक्त कर नसतो. आयकर रिटर्न (ITR) भरताना तो तुमच्या एकूण करदायित्वात समाविष्ट केला जातो. जर तुमचे करदायित्व कमी असेल किंवा तुम्ही रिफंडसाठी पात्र असाल, तर तुम्हाला कापलेला टीडीएस परत मिळू शकतो.

News Title: These Small Finance Banks Offer Up to 8% Interest on 5-Year FD for General Citizens

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now