ठाणेकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ महत्वाच्या भागात होणार भुयारी मार्ग

On: March 31, 2025 11:36 AM
Pune Tunnel Project
---Advertisement---

Thane to Vasai Tunnel | ठाण्यातील घोडबंदर रोड आणि फाउंटन हॉटेल जंक्शनवरील भीषण वाहतूक कोंडीतून आता सुटका मिळणार आहे. एमएमआरडीएने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाणे-फाउंटन मार्गासाठी दोन मोठ्या भुयारी बोगद्यांची घोषणा केली आहे. यामुळे वसई-विरारकडे जाणारा प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. ( Thane to Vasai Tunnel)

गायमुख ते फाउंटन हॉटेल: 5.5 किमीचा भुयारी मार्ग

ठाणेतील घोडबंदर रोडवर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी जाणवते. विशेषतः गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनदरम्यानचा प्रवास अनेक वेळा 30-40 मिनिटांहून अधिक वेळ घेतो. हीच समस्या लक्षात घेता, एमएमआरडीए (MMRDA) या मार्गावर दोन स्वतंत्र भुयारी बोगदे निर्माण करणार आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 5.5 किलोमीटर असून, प्रत्येकी 3.5 किलोमीटर लांबीचे सहा पदरी दोन बोगदे असतील. या भुयारी मार्गासाठी सुमारे 1,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे ठाणे, वसई, विरार तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही.

फाउंटन हॉटेल ते भाईंदर: आणखी एक भुयारी सुविधा

या महत्त्वाच्या प्रकल्पासोबतच, फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यानसुद्धा उन्नत मार्ग (Elevated Road) आणि भुयारी मार्ग बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी आणखी 1,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्यास, ठाण्याहून वसई किंवा भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

या भुयारी मार्गामुळे मीरा रोड, भाईंदरसारख्या उपनगरांत पोहोचण्यासाठीही जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच हे मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाशी थेट जोडले जाणार असल्याने लांबच्या प्रवासासाठीही हा बायपास मार्ग फायदेशीर ठरणार आहे.

Title : Thane to Vasai Tunnel Route Announced

 

Join WhatsApp Group

Join Now