स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळले, त्यानंतर महिला शिक्षिकांचं धक्कादायक कृत्य

On: July 9, 2025 8:04 PM
Crime News
---Advertisement---

Thane News | ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. येथील आर. एस. दामानिया शाळेवर (R. S. Damania School) पालकांनी गंभीर आरोप केले असून, या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नक्की काय घडलं?

पालकांच्या आरोपानुसार, शाळेच्या स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने, शाळेतील सहावी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींना तपासणीसाठी बोलावण्यात आले. यावेळी महिला शिक्षिकांनी या सर्व मुलींचे कपडे काढून तपासणी केली. हा धक्कादायक प्रकार शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या आदेशानुसारच (Thane News) घडल्याचा दावा पालकांनी केला आहे.

या घटनेमुळे पालक प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. अनेक संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करत, दोषी मुख्याध्यापिकेवर आणि शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही पालकांनी तर ‘शाळेला टाळे ठोका’ अशी मागणी करत आपला संताप व्यक्त केला.

घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ-

या प्रकारानंतर, शाळेतील मुलींमध्ये (Thane News) दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तपासणीदरम्यान सर्व मुलींचे फिंगरप्रिंट्स देखील घेण्यात आल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली असून, शाळेच्या व्यवस्थापनावर आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

News Title – thane news School Accused of Strip-Searching Girls

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now