Thalapathy Vijay | तामिळ चित्रपट अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) याच्या करूर येथे झालेल्या निवडणूक रॅलीतील चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. रविवारी (Sunday) उपचारादरम्यान 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 18 महिला, 13 पुरुष आणि 10 मुले आहेत. एकूण 95 जण जखमी असून त्यापैकी 51 जण आयसीयूमध्ये (ICU) गंभीर अवस्थेत आहेत.
घराला बॉम्ब ने उडवण्याची मिळाली धमकी :
रविवारी रात्री चेन्नई (Chennai) पोलिसांना माहिती मिळाली की, विजय याच्या नीलंकराई येथील घरात बॉम्ब (Bomb) ठेवण्यात आला आहे. तात्काळ पोलिसांनी घराची सुरक्षा वाढवली. बॉम्बशोधक पथकाने झडती घेतली; मात्र कोणतेही स्फोटक आढळले नाही.
दरम्यान शनिवारी विजय याने करूर (Kerur) येथे रॅली आयोजित केली होती. 10 हजार लोकांना परवानगी होती, पण 30 हजारांहून अधिक लोक जमले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. विजय यांच्या पक्ष तमिळगा वेत्री कळगम (TVK) ने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) पुढे ढकलण्यात आली असून ती आता मदुराई खंडपीठात होऊ शकते.
पक्षाचे वकील अरिवझगन यांनी दावा केला की, ” ही संपूर्ण घटना काही द्रमुक नेत्यांच्या कटातून घडवून आणली गेली आहे. त्यामुळे एसआयटी (SIT) किंवा सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
चेंगराचेंगरीची संभावीत कारणे :
विजय जवळपास सहा तास उशिरा पोहोचल्याने मोठी गर्दी झाली. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास काही लोक विजय याच्या बसकडे धावले आणि गोंधळ उडाला. अनेक मुले चेंगराचेंगरीत चिरडली गेली. विजय याच्या स्टेजजवळ पोलीस वा स्वयंसेवक नव्हते, त्यामुळे नियंत्रण सुटले. (Thalapathy Vijay)
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी चौकशीसाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तर विजय याने मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी रात्री उशिरा करूर येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.
News Title :- Thalapathy Vijay Rally Death Toll Reaches 41; Bomb Threat at Home, Police and Bomb Squad Deployed – Karur Rally Tragedy






