भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…

On: May 18, 2024 8:58 AM
Devendra Fadanvis
---Advertisement---

Maharashtra l राज्यातील लोकसभा निवडणूक पाचव्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे, कल्याण या प्रमुख मतदार संघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाला अगदी दोन दिवस शिल्लक असल्याने बारामती, अहमदनगरनंतर आता मुंबई येथील मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पैसे वाट्ल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे.

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसे वाट्ल्याचा ठाकरे गटाचा आरोप :

भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या पक्ष कार्यलयाच्या बाहेर ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं आहे असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर भाजप कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले होते.

यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी पोलीसांनी मध्यस्ती करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जाऊन घटनेचा आढावा घेतला. मात्र त्यावेळी पोलिसांनी झडती घेऊन कार्यलाजवळ असे काहीही झाले नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

Maharashtra l निवडणूक आयोग त्यांचे काम करत नाही : आदित्य ठाकरे

या सर्व प्रकरणावरआदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या पक्ष कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं मात्र पोलीस त्यावेळी आले नाही. या सर्व प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे. जे काम निवडणूक आयोगाच आहे ते करत नसल्यामुळे हे असे प्रकार सर्व घडत आहेत.

पुण्यातील मतदानाच्या वेळी देखील पुण्यात असाच प्रकार घडला होता. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आंदोलनाला बसले होते. मात्र निवडणूक आयोग त्यांचे काम व्यवस्थित करत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

News Title – Thackeray group alleges that money was distributed near BJP candidate Mihir Kotecha’s office

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंचा संबंध “भगव्याशी नाही तर फक्त हिरव्याशी”…’या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल

गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या”

होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू!

धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं,अन्…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now