‘मी गाडीची लाईट…’; दत्ता गाडेला पकडणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितला थरारक अनुभव

On: February 28, 2025 1:29 PM
Swargate Rape Case Villager Ganesh Gavhane Key Role in Arrest
---Advertisement---

Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या अटकेत गुणाट गावातील गणेश गव्हाणे (Ganesh Gavhane) यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोन दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्ताला गव्हाणे यांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दत्ता गाडे दोन दिवसांपासून पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन मदतीची विनंती केली. (Swargate Rape Case)

गव्हाणे यांचा थरारक अनुभव

गणेश गव्हाणे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “पहिल्या दिवशी पहाटे सव्वा पाच वाजता दत्ता पाणी पिण्यासाठी आला आणि जेवण करून गेला. संध्याकाळी साडे दहा वाजता तो पुन्हा महेश वेरट यांच्या घरी पाणी मागायला आला, पण महेश यांनी त्याचे लोकेशन पोलिसांना दिले आणि दत्ताने तिथून पळ काढला. साडे दहा ते एक वाजेपर्यंत आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो सापडला नाही,” असे गव्हाणे यांनी सांगितले.

“मी, माझे शेजारी साईनाथ आणि शाम असे तिघे शोध घेत होतो. मी गाडीवरून क्रिकेटच्या मैदानाकडे गेलो. तिथे एक विहीर आहे, तिथे तो बसलेला दिसला. गाडीचा लाईट त्याच्यावर पडताच तो उठून गावाच्या दिशेने पळू लागला. मी गाडीची लाईट सुरू ठेवली आणि पळत जाऊन त्याला पकडले,” असे गव्हाणे यांनी सांगितले

“मी त्याला पकडल्यावर तो म्हणाला, मला माझ्या मुलासोबत बोलू द्या, मी उद्या हजर होतो. त्याच्या हातामध्ये ‘रोगर’ या औषधाची बाटली होती, ती मी हिसकावून घेतली, त्यामुळे अनर्थ टळला,” असे गव्हाणे यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि दत्ताचे बोलणे करून दिले. त्यानंतर पोलीस (Police) घटनास्थळी आले आणि दत्ताला घेऊन गेले.

वैद्यकीय तपासणी आणि पुढील कारवाई

आरोपी दत्ता गाडे याची सकाळी पहाटे पाच वाजता ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला लष्कर पोलीस स्टेशनच्या (Lashkar Police Station) लॉकरमध्ये ठेवण्यात आले असून, आज शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात येणार आहे.

Title : Swargate Rape Case Villager Ganesh Gavhane Key Role in Arrest

 

Join WhatsApp Group

Join Now