Swargate rape case | स्वारगेट एसटी बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा धक्कादायक तपास अहवाल समोर आला आहे. (Swargate rape case)
गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावाचा (Gunat) रहिवासी असून, त्याच्यावर आधीपासूनच विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र, राजकीय आश्रयामुळे तो मोकाट फिरत होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात शोधमोहीम सुरू केली असून, त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
ताई म्हणत विश्वास संपादन केला अन् घात केला
या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, गाडेने पीडित तरुणीला ‘ताई’ म्हणत विश्वास संपादन केला आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली. मात्र, हा विश्वासघात ठरला. त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि नंतर जीवेमारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणानंतर पुण्यात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे.
अभिनेता पुष्कर जोगचा संताप: “सोडू नका, धरून फोडा!”
या घटनेवर मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “पुण्यात एका २६ वर्षीय मुलीवर स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये अत्याचार… क्लेशदायक, संतापजनक! आता बास!!! नराधमाला सोडू नका… सापडला तर धरून फोडा त्याला! #राग”
आणखी एक पोस्ट शेअर करत पुष्कर जोगने आरोपीला तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप तो फरार आहे. आरोपीच्या मागे राजकीय छत्र असल्याने त्याला पळवण्याचा प्रयत्न होतोय का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Swargate rape case)
Title : Swargate Rape Case Actor Pushkar Jog Demands Strict Punishment






