स्वारगेट प्रकरणातील आरोपीचं राजकीय कनेक्शन उघड?; आमदारानं सगळं सांगून टाकलं

On: February 27, 2025 1:37 PM
Swargate Rape Case
---Advertisement---

Swargate Rape Case | स्वारगेट (Swargate Rape Case) बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) अजूनही फरार असून, पोलिसांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या तपासादरम्यान आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपीच्या राजकीय संबंधांमुळे चर्चा तापली

दत्तात्रय गाडे याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके (Dnyaneshwar Katke) यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो कटके यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक माहितीनुसार, तो गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी घेऊन जायचा आणि आमदाराचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा, असेही उघड झाले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही आढळले आहे की, दत्तात्रय गाडे हा राजकीय नेत्यांशी आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्कात होता. त्यामुळे या प्रकरणात त्याला मदत मिळत होती का, याबाबत चौकशी सुरू आहे.

दत्तात्रय गाडेवर आधीपासूनच शिरूर (Shirur) आणि शिक्रापूर (Shikrapur) पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो प्रचारात सक्रिय होता, असेही उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या राजकीय आणि सामाजिक संपर्कांचा तपास सुरू केला आहे. आरोपी गाडेचा राजकीय संबंध समोर आल्यानंतर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “दत्तात्रय गाडे हा माझा कार्यकर्ता नाही. त्याने माझा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता ठरत नाही. माझा आणि त्याचा कोणताही संबंध नाही,” असे कटके यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची कसून चौकशी सुरू

आरोपी अजूनही फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी शिरूर आणि पुणे पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. आरोपीचे राजकीय संबंध, निवडणुकीतील सहभाग आणि पोलिसांशी असलेले संबंध याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी पुण्यात बोलावले आहे आणि शिरूर येथे त्याच्या घरावर देखरेख ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या राजकीय संबंधांमुळे सरकार आणि पोलिसांवर आणखी दबाव वाढला आहे. पोलिसांनी त्याला मदत मिळाली का? त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली का? याचा तपास सुरू केला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.

Title : Swargate Rape Case Accused Political Links Exposed 

 

Join WhatsApp Group

Join Now