अमितेश कुमार यांनी दत्ता गाडेबाबत दिली धक्कादायक माहिती!

On: February 28, 2025 2:04 PM
Swargate Rape Case Accused Attempts Suicide but Fails
---Advertisement---

Swargate Rape Case | स्वारगेट (Swargate) बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याने स्वतःसोबत किटकनाशकाच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या. पोलिसांच्या अटकेपूर्वीच त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच दक्षता घेत त्याला ताब्यात घेतले. गावकऱ्यांनी त्याला संभाषणात गुंतवून ठेवले, तेव्हाच पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती दिली. (Swargate Rape Case)

गळ्यावर आढळले दोरीचे वण

पोलिसांना आरोपी दत्ता गाडेच्या जवळ विषाची बाटली आढळली. त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का, याविषयी चर्चा सुरू झाली. पत्रकार परिषदेत यासंबंधी विचारणा करण्यात आली असता, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आल्याचे सांगितले.

गाडेच्या गळ्यावर दोरीचे वण आढळल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, दोरी तुटल्याने तो वाचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

500 पोलिसांचा शोध मोहीम आणि आरोपीला अटक

दत्ता गाडेला शोधण्यासाठी क्राइम ब्रँच, झोन टू आणि इतर विभागाच्या एकत्रित पथकाने मोठी मोहीम राबवली होती. जवळपास 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांपासून त्याच्या मागावर होते. स्थानिक रहिवाशांचेही मोठे सहकार्य मिळाले. डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला.

अखेर, दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या ग्रामस्थांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ग्रामस्थांचे आभार मानत त्यांना योग्य ते सन्मान देण्याचे आश्वासन दिले.

Title : Swargate Rape Case Accused Attempts Suicide but Fails

 

Join WhatsApp Group

Join Now