Swargate Case | स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) आणि पीडित तरुणी यांची आधीपासून ओळख होती आणि त्यांच्यात जे काही घडले, ते दोघांच्या संमतीने झाले होते, असा आरोप वकिलांनी केला आहे. तसेच, हा प्रकार बलात्कार नव्हता, तर परस्पर सहमतीने घडलेली घटना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Swargate Case)
कॉल रेकॉर्ड तपासल्यास सत्य उघड होईल
आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, दत्तात्रय गाडे आणि संबंधित तरुणी एकमेकांना गेल्या एक महिन्यापासून ओळखत होते. त्यांच्या फोन कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली तर हे स्पष्ट होईल की, त्यांच्यात पूर्वीपासून संवाद होत होता. त्यामुळे ही घटना अचानक घडलेली नाही, असा दावा बचाव पक्षाने केला आहे. पोलिसांनी या दाव्याची गंभीर दखल घेऊन कॉल डिटेल्सची तपासणी करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
पळून जाण्याचा आरोप चुकीचा – वकील
आरोपी गाडे पळून गेला नव्हता, तर तो त्याच्या गावी गेला होता, असा खुलासाही वकिलांनी केला आहे. पोलिसांनी त्याच्या गावात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवल्याने तिथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे गाडे घाबरून एका ठिकाणी लपून बसला होता, असा खुलासा बचाव पक्षाने केला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी अधिक चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली आहे.
आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये पैशांवरून वाद झाला होता, त्यामुळे तिने बलात्काराचा आरोप केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपोमध्ये झाली होती. (Swargate Case)
गाडेने वकिलांना सांगितले की, “मी तिला कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले.” तसेच, त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही (Agent) उपस्थित होता, असेही गाडेने सांगितले.
Title : Swargate Case Accused Claims Consent Not Rape






