“मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक…”, राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचा करारा जवाब

On: May 13, 2024 2:17 PM
Sushma Andhare
---Advertisement---

Sushma Andhare | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा झाली. सभेत बोलत असताना त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा लाव रे तो व्हिडीओ स्टाईलने जुना व्हिडीओ दाखवत सुषमा अंधारे यांना डिवचलं. त्यावर आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना करारा जवाब दिला.

रमेश ‘किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसांची आठवण करून देणारं एक ट्विटच अंधारे (Sushma Andhare) यांनी पोस्ट केलं. सोमवारी संध्याकाळी मी तुम्हाला उत्तर देईल, असं त्या म्हणाल्या होत्या. ट्विटच्या माध्यमातून अंधारे यांनी राज ठाकरे यांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे.

ट्विटच्या माध्यमातून अंधारेंचा करारा जवाब

मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे, असं अंधारे म्हणाल्यात.

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?, असंही त्यांनी म्हटलंय.
27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? …पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना?, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केलीये.
सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा…!, अशा कडक शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

News Title – Sushma Andhare Replied To Raj Thackeray Via Twitter

महत्त्वाच्या बातम्या

आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने घेऊन गेले ‘या’ मतदारसंघात पैशांच्या बॅगा; ‘या’ बडया नेत्याचा आरोप

मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका

Join WhatsApp Group

Join Now