राज ठाकरेंच्या भाषणानंतर केडियाने गुडघे टेकवले, केला ‘तो’ व्हिडीओ शेअर!

On: July 5, 2025 2:47 PM
sushil kedia
---Advertisement---

Sushil Kedia | शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’ (Kedianomics) फर्मचे संस्थापक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिलेल्या आव्हानानंतर अखेर जाहीर माफी मागितली आहे. मनसे सैनिकांनी केडिया यांच्या कार्यालयावर केलेल्या आंदोलनानंतर आणि आज (शनिवार, ५ जुलै २०२५) वरळी येथे झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक मेळाव्यानंतर केडिया यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपले वक्तव्य मागे घेतले आहे.

व्हिडिओ शेअर करत केडिया वक्तव्य मागे-

सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना आव्हान देत एक वादग्रस्त विधान केले होते. “नोंद घ्या राज ठाकरे, मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठीचे कैवारी आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…” असे त्यांनी म्हटले होते. या विधानानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी वरळीतील मेळाव्यापूर्वीच केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड करत तिथे नारळ फेकले होते.

या आक्रमक आंदोलनानंतर आणि आज वरळी डोम येथे पार पडलेल्या, १८ वर्षांनी एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणानंतर सुशील केडिया यांनी नमते घेतले. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सुरुवातीला ‘माझ्या ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्यात आला’ असे म्हटले असले, तरी पुढे त्यांनी आपली चूक मान्य केली आहे.

मला माझ्या चुकीची जाणीव झाली-

“मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे,” असे म्हणत केडिया (Sushil Kedia) यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आणि आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेत असल्याचे जाहीर केले. सुशील केडिया हे शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि त्यांची ‘केडियानॉमिक्स’ ही संस्था आर्थिक सल्ला देण्याचे काम करते. भारतीय शेअर बाजारात त्यांना २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्याचा त्यांचा दावा आहे.

News Title – Sushil Kedia Apologizes to Raj Thackeray

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now