Suryakumar Yadav| भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्याच्या चाहत्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे.
देविशा शेट्टीच्या बेबी शॉवरचा (डोहाळे जेवण) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या काही काळापासून देविशा प्रेग्नंट असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, यादव कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नव्हती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सूर्या आणि देविशा एका हॉलमध्ये एकत्र प्रवेश करताना दिसत आहेत. देविशाचा ‘बेबी बंप’ स्पष्टपणे दिसत असून तिचे कौतुक करण्यासाठी जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित असल्याचे दिसते. या बातमीनंतर क्रिकेट विश्वातून आणि चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Baby shower of Suryakumar Yadav and Devika 😍❤️ pic.twitter.com/rYudGduOPE
— Jeet (@JeetN25) March 14, 2026
टी-20 विश्वचषक जिंकल्यापासून सूर्यकुमार यादव कमालीचा व्यस्त आहे. शनिवारी सूर्याने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत विश्वचषक ट्रॉफी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह देखील उपस्थित होते. दर्शनानंतर त्याच संध्याकाळी सूर्याने ‘CNBC TV18 इंडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड्स’मध्ये हजेरी लावली, जिथे त्याला त्याच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी सन्मानित करण्यात आले.
सूर्यकुमार यादवने आपल्या नेतृत्वाखाली भारताला तिसरा टी-20 विश्वचषक मिळवून दिला आहे. फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे सूर्याचे नाव आता महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत बसला आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज असून टी-20 क्रिकेटमधील त्याच्या वेगवान आणि अनोख्या फलंदाजी शैलीसाठी तो प्रसिद्ध आहेत. त्याचे चाहते त्याला “SKY” या नावानेही हाक मारतात.






