Suryakumar Yadav | क्रिकेट मैदानावरील आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात त्याने केलेल्या धमाकेदार डान्समुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या परफॉर्मन्समध्ये त्याने ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध स्टेप सादर केली आणि त्याचा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला.
‘धुरंधर’ स्टेप करून सूर्यकुमारची धमाल एन्ट्री :
‘धुरंधर’ (Dhurandhar) आणि ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) या चित्रपटांची क्रेझ सध्या प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या लोकप्रियतेचा प्रभाव आता क्रिकेटपटूंवरही पडलेला पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एका स्टेज कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या सादरीकरणादरम्यान त्याने अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांनी रहमान डकैत या भूमिकेत केलेली प्रसिद्ध हुक स्टेप पुन्हा साकारली.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केला. 2 एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमारचा रिलॅक्स आणि मस्तीखोर अंदाज पाहायला मिळतो. संघाने व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये “ही दादाची स्टाईल आहे, पूर्ण धुरंधर मोड” असा उल्लेख केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली.
Suryakumar Yadav | आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात :
आयपीएल 2026 (IPL 2026) हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने शानदार सुरुवात केली आहे. 29 मार्च रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघावर 6 विकेट्सने विजय मिळवत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. या सामन्यात रायन रिकेल्टन (Ryan Rickelton) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या सामन्यात 221 धावांचे मोठे लक्ष्य मुंबई इंडियन्सने गाठले आणि 2012 नंतर प्रथमच संघाने आयपीएल हंगामाचा पहिला सामना जिंकला. पुढील सामना 4 एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे. दरम्यान, यापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला होता.






