Suryakumar Yadav | टीम इंडिया (Team India) चा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आला आहे. जरी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2026 टी20 वर्ल्डकप जिंकला असला तरी वैयक्तिक कामगिरी मात्र अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदासह संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खराब फॉर्ममुळे निवड समितीच्या रडारवर :
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून आयपीएल 2026 मध्ये खेळताना सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीत सातत्य दिसून आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा फॉर्म घसरलेला असल्याने टी20 वर्ल्डकपपासून ते इतर मालिकांपर्यंत त्याची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. अंतिम सामन्यातही तो शून्यावर बाद झाल्यामुळे टीका अधिक वाढली.
त्याच्या या घसरत्या प्रदर्शनामुळे निवड समिती त्याच्याकडे बारकाईने पाहत आहे. भविष्यात पर्यायी कर्णधार शोधण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची त्याची इच्छा असली तरी सध्याच्या फॉर्ममुळे त्याची निवड होईल की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Suryakumar Yadav | आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर भविष्य ठरणार :
आयपीएलनंतर भारतीय संघ आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार असून, या मालिकांमध्ये सूर्यकुमार यादवसाठी ही निर्णायक संधी ठरणार आहे. या दौऱ्यात त्याची फलंदाजी आणि नेतृत्व दोन्हीची कसोटी लागणार आहे. याच कामगिरीवर त्याचे पुढील स्थान निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बीसीसीआयच्या मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तो कर्णधार असला तरी त्याला फलंदाज म्हणूनही प्रभावी कामगिरी करणे आवश्यक आहे. जर या मालिकांमध्ये तो अपयशी ठरला, तर त्याच्या जागी शुभमन गिल (Shubman Gill) याचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादवसाठी आगामी सामने ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण करणारे ठरणार आहेत.






