Casting Couch | बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudchi) यांनीही कास्टिंग काउचविषयी धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडलेल्या काही खळबळजनक घटनांचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, नवोदित असताना इंडस्ट्रीबद्दल फारशी माहिती नसल्याने काही गैरअनुभवांना सामोरे जावे लागले. (Casting Couch)
कुडची यांनी सांगितले की, सिनेसृष्टीत काम सुरू करताना त्या आराम नगर भागातील एका ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी C ग्रेड भूतपटांची पोस्टर्स लावलेली होती. त्या काळात त्यांना A आणि C ग्रेड चित्रपटांचा अर्थ माहित नव्हता. त्या चित्रपटांमध्ये काम करणारी काही ओळखीची माणसं होती, त्यामुळे त्यांनी योग्य ठिकाणी आल्याचं मानलं. मात्र, लवकरच त्यांना समजलं की हे ठिकाण विश्वासघातकी आहे.
‘एका रात्रीचे किती घेणार?’ – थक्क करणारा प्रश्न
पुढे त्या म्हणाल्या की, एका व्यक्तीने त्यांना थेट विचारलं – “एका रात्रीचे किती घेणार?” या प्रश्नाने त्या अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “मी पटकन उत्तर दिलं, तुम्ही जेवढं द्याल तेवढं घेईल.” हा प्रसंग त्यांनी जरी विनोदी स्वरूपात सांगितला असला, तरी त्यामागील कटू वास्तव त्यांनी अधोरेखित केलं.
View this post on Instagram
त्यानंतरही अशा काही घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. एका वेळी एका निर्मात्याने त्यांना लीड रोल देण्याचं आमिष दाखवून विचारलं की, “तुम्ही आम्हाला काय देणार?” सुरुवातीच्या काळात अशा प्रकारची वागणूक वारंवार मिळाली. पण, पुढे त्यांची ओळख आणि स्थान निर्माण झाल्यानंतर कोणाची अशी हिंमत झाली नाही, असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या.
‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
सुरेखा कुडची यांनी देवयानीसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Title : Surekha Kudchi Reveals Casting Couch Horror






