Supriya Sule | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ठेवलेल्या नव्या व्हॉट्सअप स्टेट्समुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
अपघातानंतरचा राजकीय धक्का आणि कुटुंबातील हालचाली :
मुंबई (Mumbai) येथून बारामती (Baramati) कडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी 8.45 वाजता भीषण अपघात झाला. ते सकाळी 8.10 वाजता प्रवासासाठी रवाना झाले होते. या दुर्घटनेत एकही व्यक्ती वाचली नाही आणि 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काळा दिवस ठरला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला.
या दुःखद घटनेनंतर काही तासांतच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घेण्यात आल्याचं समोर आलं. मात्र, त्यांच्या दोन्ही मुलांना याबाबत माहिती होती आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांनी शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती, अशी माहिती देण्यात आली.
Supriya Sule | सुप्रिया सुळेंचे स्टेट्स आणि राजकीय संकेत :
सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं असून, सुप्रिया सुळे यांनीही याच भूमिकेला दुजोरा दिला आहे. सध्या दिल्लीत (Delhi) असलेल्या सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या निधनानंतर सातत्याने त्यांच्याशी संबंधित व्हॉट्सअप स्टेट्स शेअर करत आहेत. त्यातील एका नव्या स्टेट्समुळे विशेष चर्चा रंगली आहे.
या स्टेट्समध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला असून, त्याला “@ बारामती……” असं कॅप्शन दिलं आहे. या शब्दांतून त्यांनी काहीतरी मोठा राजकीय किंवा भावनिक संकेत दिल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट (Nationalist Congress Party) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, याबाबत खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी सध्या एकत्र येण्यावर खंड पडल्याचं वक्तव्य केलं आहे. (Supriya Sule Whatsapp Status)
तसेच, अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात पक्ष विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी या दाव्यांचा स्पष्ट इन्कार करत अशा कोणत्याही चर्चा झाल्या नसल्याचं सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.






