सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खुलं आव्हान, म्हणाल्या…

Supriya Sule | लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. महाविकास आघाडीने राज्यात बाजी मारली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील 10 पैकी 8 उमेदवारांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विजय मिळवला. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील असलेला छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचं आता जाहीर केलं आहे. कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रूळावर आणायचा असा निर्धार त्यांनी भरसभेत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या राजकीय आणि समाजिक कारकिर्दीची सुरूवात ही ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर आली. त्याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं वक्तव्य महत्त्वाचं ठरलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड आणि इंदापूरमधील स्वागत पाहून मला पहिल्यांदाच निवडून आल्यासारखं वाटलं. आज स्वागताला जो माहोल होता, तसा माहोल याआधी कधीच पाहिला नव्हता. आपले 10 पैकी 8 आमदार निवडून आले होते. त्यातील साताऱ्यात पिपाणी चिन्ह असणाऱ्या उमेदवाराने  46 हजार मतं घेतली. भवानीनगर साखर कारखाना आपल्याला लढायचा आहे आणि जिंकायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

ईथेनॉलसाठी मी संसदेत बोलले आहे. दुध आणि शेतकऱ्याच्या कांद्याला हमीभाव दिला नाहीतर पुढील 10 दिवसांमध्ये आंदोलन करायचं आहे. बेरोजगारी, महागाईला कंटाळून लोकांनी मतदान दिलंय. काही दिवसांनी बारातीवर मीर्झापूरसारखी फिल्म काढू. टीव्ही सिरीयलसारखे सकाळपासून अनेक बदल निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. बुथ कमिटीची नावं देखील आम्ही गुपित ठेवली असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

“सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहिल”

एकाच माणसाला बारामती मतदारसंघ माहिती होता त्याचं नाव म्हणजे शरद पवार. श्रीनिवास दादा आणि आम्ही अनेक ठिकाणी गेलो आणि लोकांनी दरवाजे बंद केले, कारण लोकांना अडचणी आणि दहशत होती. परंतू लोकांनी त्यांनाच मतदानातून उत्तर दिलं आहे. शरद पवार आणि लोकांनी आमच्यासाठी त्रास सहन केला आहे. लोकांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवल्या तरीही अडचणी येत होत्या. असो झालं गेलं गंगेला मिळालं, आता लोकांना मदत करायची आहे. कोणत्याही माणसाला अडचण येऊ देणार नाही आणि वीज, पाणी मूलभुत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवरून त्रास झाला तर सुप्रिया सुळे ही ढाल म्हणून उभी राहिल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

News Title – Supriya Sule Open Challenge To Ajit Pawar After Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…

या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत