अजित पवार मुख्यमंत्री होणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या “पांडुरंग नक्कीच…”

On: June 18, 2025 3:45 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. त्यांनी स्वतःही यावर जाहीरपणे मत व्यक्त केले आहे. अशातच त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी माध्यमांसमोर या विषयावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतो,” असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुनेत्रा पवार (Sunetra pawar) म्हणाल्या, “आपण सगळेच चांगल्या इच्छा आणि अपेक्षा बाळगत असतो. पण शेवटी काय द्यायचं, काय नाही हे देवाच्या हातात असतं. पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करेल.” त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का यावरचा उत्सुकतेचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.

अजित पवारांची थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा :

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मे महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमात थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. “मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना उघडपणे बोलून दाखवल्या. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी अनेकदा पार पाडली असली तरी मुख्यमंत्रीपद मात्र अजूनही दूरच आहे.

या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी याला आगामी राजकीय घडामोडींची नांदी मानलं. त्यात आता सुनेत्रा पवार यांची दिलेली ही भावनिक प्रतिक्रिया अजित पवारांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Ajit Pawar | महाविकास आघाडीतून ऑफरही मिळाली होती :

अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. “अजित पवार महाविकास आघाडीत आले तर त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल,” असं त्यांनी म्हटलं होतं. यावर अजित पवारांनी मात्र संयमित भूमिका घेतली होती.

राज्यातील राजकीय स्थिती सध्या साशंक आहे. त्यामुळे अजित पवारांचा पुढील राजकीय निर्णय, सुनेत्रा पवारांचे सूचक विधान आणि आगामी विधानसभा निवडणुका यांचा परस्पर संबंध जोडला जातोय. आता पांडुरंग कुणाच्या मनोकामना पूर्ण करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

News Title: Sunetra Pawar Reacts on Ajit Pawar’s CM Wish: “Pandurang Will Surely Fulfill Everyone’s Desire”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now