Rohit Pawar | महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर राजभवनावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने भरून निघाली असली तरी आता त्यांच्या हाती नेमकी कोणती खाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
रोहित पवारांची भावनिक पोस्ट:
अशातच आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहतो.”
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुढे लिहिलं की, “डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही.” त्यांच्या या शब्दांमधून अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर आलेल्या दुःखाची तीव्रता स्पष्ट होते.
Rohit Pawar | सुनेत्रा पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा :
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच रोहित पवारांची ही भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अनेकांनी त्यांच्या पोस्टवर भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






