Summer Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात वाढलेल्या तापमानामुळे अनेकांना पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी, अपचन, उलट्या आणि अतिसार अशा त्रासदायक तक्रारींचा सामना करावा लागतो. या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीसह काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Summer Health Tips)
उष्णतेचा शरीरावर परिणाम, हायड्रेशन सर्वात महत्त्वाचं
उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे अधिक प्रमाणात पाणी बाहेर पडते, त्यामुळे डिहायड्रेशनची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम पचन संस्थेवर होतो आणि त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस निर्माण होतो. त्यामुळे दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे अनिवार्य आहे. याशिवाय लिंबू सरबत, नारळपाणी, ताक, फळांचे ज्यूस अशा नैसर्गिक पेयांचा समावेश केल्यास शरीरातील हायड्रेशन टिकून राहतो.
या काळात जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत. फास्ट फूड, जंक फूड यामुळे अॅसिडिटी आणि अपचन वाढू शकते. त्याऐवजी लापशी, सूप, सॅलड यासारखा हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा. हे पदार्थ पचनास मदत करतात आणि पोट निरोगी ठेवतात. उन्हाळ्यात बाहेरचं अन्न शक्यतो टाळावं, कारण बॅक्टेरिया आणि विषाणू याच काळात जास्त वाढतात. त्यामुळे अन्नातून संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
मानसिक स्वास्थ्यही करते पचनावर परिणाम
फक्त आहारच नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यही पचनावर परिणाम करते. उन्हाळ्यातील वाढलेली अस्वस्थता, गरमी आणि अस्वस्थ झोप यामुळे मानसिक ताण वाढतो आणि त्याचा परिणाम थेट पोटावर होतो. तणावामुळे अन्न नीट पचत नाही. त्यामुळे ध्यान, प्राणायाम आणि सौम्य योगाभ्यास यांचा सराव केल्यास मानसिक आणि पचन स्वास्थ्य राखता येतं.
ताज्या फळांचा समावेशही अत्यंत फायदेशीर आहे. फळांमध्ये असलेलं पाणी आणि नैसर्गिक साखर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ओलावा देतात. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी यांसारखी फळं उन्हाळ्यात नियमित खाल्ल्यास शरीर ताजं आणि हायड्रेटेड राहतं.
Title : Summer Health Tips Beat Heat-Related Issues






