शिवसेनेत 18 वर्ष, तरीही अनादर! बडगुजर भाजपमध्ये, पक्षांतरापूर्वी मन मोकळं केलं

On: June 17, 2025 11:32 AM
Sudhakar Badgujar
---Advertisement---

Sudhakar Badgujar | नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठी हलचल निर्माण करणाऱ्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षप्रवेशाआधी त्यांनी आपल्या मनातील खदखद प्रकट करत शिवसेनेवर (ठाकरे गट) थेट आरोप केले आहेत. “मी 18 वर्ष शिवसेनेत काम केलं, पण मला अनादराने हाकललं, माझी काय चूक होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

बडगुजर यांना शिवसेना (ठाकरे गट) कडून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पक्षांतराची तयारी सुरू केली आणि आता मुंबईत भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजता शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.

“जिथे आदर मिळतो, तिथे जायला हरकत नाही” – बडगुजर :

पक्षप्रवेशापूर्वी पत्रकारांशी बोलताना बडगुजर म्हणाले, “2017 ते 2022 हा पाच वर्षांचा अपवाद वगळता सध्या राज्यात प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळवून देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे. जिथे सन्मान आणि आदर मिळतो, तिथे जायला हरकत नाही.” (Sudhakar Badgujar)

ते पुढे म्हणाले, “मी शिवसेनेत 18 वर्ष काम केलं, पण माझा अनादर करण्यात आला. मला हाकलण्यात आलं. पण माझी काय चूक होती हे मला अजूनही समजलेलं नाही. त्यामुळे मी आता योग्य पक्षात प्रवेश करत आहे.”

Sudhakar Badgujar | स्थानिक विरोध असूनही प्रवेश, शक्तिप्रदर्शनाची तयारी :

बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकचे आमदार आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. विशेषतः आमदार सीमा हिरे (Sima hire) यांनी या प्रवेशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तरीही भाजपने त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी माजी मंत्री पवन घोलप यांच्यासह काही अन्य कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत बडगुजर मोठे शक्तिप्रदर्शन करणार असून, त्यांच्या शेकडो समर्थकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

बावनकुळे म्हणाले – “माझ्या माहितीत नाही!” :

या पक्षप्रवेशावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. आमच्याकडे पक्षप्रवेश स्थानिक नेते, आमदार, खासदार यांच्या एकमताने होतो. नाशिकमधील स्थानिक पातळीवर विरोध असल्याने माझ्याशी याबाबत चर्चा झालेली नाही.”

दुसरीकडे, बडगुजर यांनी बावनकुळे यांच्या या विधानावर बोलणे टाळत, “सर्व ठरले आहे, त्याशिवाय मी का जाणार?” असे म्हणत प्रवेश निश्चित असल्याचे सूचित केले.

News Title: Sudhakar Badgujar Quits Shiv Sena, Joins BJP After 18 Years: “I Was Disrespected, What Was My Mistake?”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now