Suchitra Krishnamoorthi | बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) हिने अलीकडेच एका मुलाखतीत गर्भवती असताना सासऱ्यांकडून झालेल्या मानसिक त्रासाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. मुलगी होणार असल्याचं समजल्यावर सासऱ्यांनी नातवासाठी केलेला दबाव आणि त्यामुळे आलेला भावनिक तणाव तिच्यासाठी पितृसत्ताक व्यवस्थेचा पहिला मोठा धक्का ठरला, असं ती म्हणाली.
अपेक्षेमुळे आनंदावर विरजण-
दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा कृष्णमूर्तीने (Suchitra Krishnamoorthi) सांगितले की ती गर्भवती असताना लंडनमध्ये (London) वास्तव्यास होती. तिथे कायदेशीर गर्भलिंग चाचणी केल्यानंतर तिला मुलगी होणार असल्याचे समजले. “आम्ही सर्व खूप आनंदी होतो. माझे आईवडीलही आनंदाने पूजाअर्चा करत होते,” असं ती आठवणींना उजाळा देत म्हणाली.
View this post on Instagram
मात्र दुसऱ्या बाजूला तिचे सासरे (father-in-law) दररोज फोन करून “मला नातवाची वाट आहे,” असं वारंवार सांगत होते. हे ऐकून तिचा मानसिक संतुलन ढासळत गेलं. “मी त्यांच्याशी बोलणंच थांबवलं, कारण रोज ते मुलगा हवा असं सांगायचे,” असं सांगत तिने त्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे स्पष्ट केलं.
शेखर कपूरसोबतच्या नात्याचे गुंतागुंत-
सुचित्राने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं. तिने कबूल केलं की दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांच्याशी तिचं लग्न, त्यानंतर झालेला घटस्फोट आणि त्यावेळची भावनिक अस्थिरता तिच्या मुलगी कावेरी कपूरवर (Kaveri Kapur) परिणाम करणारी ठरली.
तिने सांगितलं (Suchitra Krishnamoorthi) की कोर्टात चाललेल्या घटस्फोटाच्या सुनावण्या, त्यादरम्यान सतत माध्यमांचं लक्ष, छायाचित्रकारांचे अनपेक्षित फोटो आणि लोकांच्या प्रतिक्रिया यांनी तिच्यावर अजूनच तणाव वाढवला होता. “आज मागे वळून पाहताना वाटतं की या भावना स्वीकारणं हीच वैयक्तिक प्रगल्भतेची एक पायरी आहे,” असं ती म्हणाली.






