Stock Market Scam | भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत,ज्यांचं शेअर मार्केटमुळे नशीब पालटलं आहे. शेअर मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. इथे क्षणात कुणी करोडपती बनते तर कुणाचं सगळं काही संपुष्टात येतं. इथे पैसा पाण्यासारखा आहे, पण प्रत्येकाला त्याचा लाभ घेता येत नाही.
मात्र व्यवस्थित अभ्यास करून शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. भारतीय इतिहासात या क्षेत्रात अनेक घोटाळे झाले आहेत. आता भारतातील नुकत्याच एका उद्योजकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुंतवणूकदारांना फटका बसणार?
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka)यांनी सर्वांत मोठा दावा केलाय.शेअर बाजारात मोठा घोटाळा चालू असून आगामी काळात सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसू शकतो,असं गोयंका म्हणाले आहेत.
इतकंच नाही तर त्यांनी शेअर बाजार नियामंक संस्था सेबी (SEBI) आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाला यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सध्या गुंतवणूकदारांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हर्ष गोयंका यांचा मोठा दावा
हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या काळातील घोटाळ्याचे दिवस कोलकात्यात परत आले आहेत. गुजराती-मारवाडी ब्रोकर्सना हाताशी धरून प्रमोटर्स त्यांच्या कंपन्यांच्या स्टॉकचे मूल्य वाढवत आहेत. हे मूल्य वाढवून प्रॉफिट कमवत आहेत, असा दावा हर्ष गोयंका यांनी केलाय.
With a booming stock market, all the malpractices of Harshad Mehta/Ketan Parekh era are back primarily in Kolkata. Promoters are inflating profits (through profit entry) and in nexus with Gujarati-Marwari brokers driving their stock prices to unrealistic levels. It’s time for…
— Harsh Goenka (@hvgoenka) May 4, 2024
यासोबतच त्यांनी सेबी आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप (Stock Market Scam) करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.हर्ष गोयंका यांच्या दाव्यामुळे सध्या गुंतवणूकदारांत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
News Title – Stock Market Scam Harsh Goenka post viral
महत्त्वाच्या बातम्या-
कोव्हिशिल्डमुळे हार्ट अटॅक आला?, श्रेयस तळपदे म्हणाला…
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ मराठी अभिनेत्याचं निधन
पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!
महाराष्ट्र हादरला! किराणा मालाच्या दुकानातून होतेय ड्रग्जची विक्री
Post Office ची कमाल योजना; ‘या’ योजनेतून महिन्याला मिळेल 20 हजार रूपये






