Chanakya Neeti | चाणक्य नीतीनुसार माणसाच्या वर्तनावरून त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवावे. आजच्या काळात विशेषतः ऑफिसमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात काही चांगले, तर काही फक्त स्वतःचा फायदा बघणारे. या संदर्भात चाणक्यांनी (Chanakya Neeti) सांगितले आहे की ऑफिसमधील काही लोकांवर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये, कारण अशा लोकांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
गोड बोलून निंदा करणाऱ्यापासून लांब रहावे
ऑफिसमध्ये काही लोक नेहमी गोड बोलतात, तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतात, पण मागे मात्र तुमच्याविषयी चुकीचं बोलतात किंवा अफवा पसरवतात. असे लोक वरून मित्र असल्याचं भासवतात पण आतून मत्सर करतात. चाणक्यांच्या (Chanakya Neeti) मते अशा लोकांपासून अंतर ठेवलं पाहिजे, कारण त्यांच्या गोड बोलण्यात विष असतं.
श्रेय ओढून घेणाऱ्या लोकांपासून लांब रहावे
काहीजण दुसऱ्याचं श्रेय स्वतःकडे ओढून घेतात. एखादं काम तुम्ही मन लावून केलं तरी अशा लोकांना त्याचं श्रेय स्वतःच्या नावावर घ्यायचं असतं. अशा लोकांवर विश्वास ठेवल्यास तुमचं नाव आणि प्रतिष्ठा धोक्यात येते. त्यामुळे चाणक्य (Chanakya Neeti) सांगतात की आपल्या कामाचं श्रेय नेहमी स्वतःकडेच ठेवा आणि त्याची पुरावे ठेवा.
चेष्टा करणाऱ्यांपासून लांब राहा
ऑफिसमधील काही लोक नेहमी इतरांची चेष्टा करण्यात आनंद मानतात. ते टोमणे मारतात, विनोदाच्या नावाखाली दुसऱ्याची थट्टा करतात आणि त्यातून स्वतःचं वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करतात. असे लोक हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी करतात आणि तुम्हाला इतरांसमोर लहान दाखवतात. चाणक्यांच्या (Chanakya Neeti) मते अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवणे हेच योग्य.
मत्सर लोकांपासून लांब राहा
याशिवाय काही लोक असे असतात जे तुमचं यश बघून अस्वस्थ होतात. ते वरकरणी हसतात, अभिनंदन करतात पण आतून जळतात. ते तुमच्या प्रगतीत अडथळे आणतात, चुकीचे सल्ले देतात आणि तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. चाणक्य (Chanakya Neeti) म्हणतात की अशा मत्सरी लोकांपासून जितकं लांब राहाल तितकं तुमचं आयुष्य शांत आणि यशस्वी होईल.
चाणक्य नीतीचा (Chanakya Neeti) संदेश आजही तितकाच लागू आहे. प्रत्येकाशी सभ्यतेने वागा, पण विवेक ठेवा. सगळ्यांना आपलं मन सांगू नका, कारण प्रत्येकजण तुमच्यासाठी प्रामाणिक असेलच असं नाही. ऑफिसमध्ये तुमचं काम, मेहनत आणि श्रेय टिकवण्यासाठी सजग राहा आणि ज्यांच्या शब्दांपेक्षा कृतींमध्ये विरोधाभास दिसतो अशा लोकांपासून अंतर ठेवा.
News Title- Stay away from these ‘four’ people in the office






