दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! निकालाच्या तारखेबाबत अधिकृत अपडेट समोर

On: April 26, 2025 8:51 AM
SSC-HSC Result 2025
---Advertisement---

SSC-HSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे. यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता होती, त्यानुसार आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.(SSC-HSC Result 2025 )

निकाल कधी लागणार?

10वी-12 वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा केली जाईल.यंदा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात बारावीच्या परीक्षा झाल्या. एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यातील 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

तर, दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येऊ नये, त्यांना अतिरिक्त वेळ मिळावा मणून यंदा परीक्षा लवकर घेण्यात आल्या.

प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणार 

आता मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच बारावी आणि दहावीचे निकाल लागतील. निकाल लवकर लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र, यंदा ही समस्या येणार नाही.

Title : SSC-HSC Result 2025

Join WhatsApp Group

Join Now