मुंबई | शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर टीका केलेली. त्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना कीर्तिकर यांनी कदम यांना थेट गद्दार असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात दिवाळीमध्येच शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्येच फटाके फुटत आहेत. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन, दिवाळीमध्येच शिवसेनेत शिमगा बघायला मिळतोय. हे पक्षासाठी भूषणावह नाही, असं रामदास कदमांनी म्हटलंय.,
गजानन कीर्तिकर ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वय 80-85 झालंय. त्यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे बसून चर्चा करायला हवी होती. पण आता त्यांचं वय जास्त झालंय. ते भ्रमिष्ट झाले असावेत, त्यांना डॉक्टरांची आवश्यकता आहे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
मी खेडमध्ये स्वत: उमेदवार असताना यांना पाडायला इथे कसा येणार? उलटपक्षी कांदिवलीला मी शाखाप्रमुख असताना, मी केलेल्या कामांवरुन गजानन कीर्तिकर निवडून आले, म्हणजे किती बेईमानी यांच्याकडे आहे. त्यांना हे शोभणारे नाही. महाराष्ट्रात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी ते अशाप्रकारची प्रेसनोट काढत आहेत. मी याचा जाहीरपणे निषेध करतो, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली.
मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसलं नाही. गद्दारी, बेईमानीची औलाद आमची नाही, ती गजाभाऊंची असेल, असं म्हणत रामदास कदमांनी कीर्तिकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मी शरद पवारांना भेटलो होतो. ते त्यांना स्वप्न पडलं असेल. गजानन कीर्तिकर पुत्रप्रेमासाठी टोकावर पोहोचले आहेत, अशी देखील टीका रामदास कदम यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो”
पुणेकरांनो काळजी घ्या! चिंताजनक बातमी समोर
“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली…
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!






