Sonam Kapoor Baby | बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. २९ मार्च रोजी या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली.
रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सोनम आणि आनंद यांनी दुसऱ्या मुलाच्या जन्माची अधिकृत माहिती दिली. त्यांनी लिहिलेल्या संदेशात, २९ मार्च २०२६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त केला असून, कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाने आयुष्यातील आनंद दुपटीने वाढल्याचे सांगितले.
या संदेशात त्यांनी मोठा मुलगा वायू (Vayu) याचा उल्लेख करत, तो आपल्या लहान भावाच्या आगमनाने अत्यंत उत्साहित असल्याचे नमूद केले. नव्या बाळामुळे घरात प्रेम आणि आनंदाची उधळण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि आता चार जणांचे कुटुंब म्हणून नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचे सांगितले.
ही बातमी समोर येताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या जोडप्याचे अभिनंदन केले. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), करीना कपूर (Kareena Kapoor), रिया कपूर (Rhea Kapoor) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.चाहत्यांकडूनही या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, नवजात बाळासाठी आशीर्वाद दिले जात आहेत. सोनम आणि आनंद यांच्या या आनंदाच्या क्षणात त्यांच्या चाहत्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे.
View this post on Instagram
सोनम आणि आनंद यांची ओळख २०१५ मध्ये ‘प्रेम रतन धन पायो’ (Prem Ratan Dhan Payo) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झाली. सुरुवातीला मित्रांमुळे झालेली ओळख पुढे संवादातून अधिक घट्ट झाली आणि काही काळानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले.२०१८ साली त्यांनी खाजगी समारंभात विवाह केला. २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे, वायूचे स्वागत केले. नोव्हेंबर २०२५ मध्ये सोनमने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती, आता या जोडप्याला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झाले आहे.






