Aishwarya Rai | अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या एकेकाळच्या गाजलेल्या नात्याचा शेवट अत्यंत वादग्रस्त ठरला होता. ऐश्वर्याने केलेल्या गंभीर आरोपांनंतर सलमानचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) याने एका जुन्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य करत ऐश्वर्यावरच काही आरोप केले होते, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते.
ऐश्वर्या रायचे आरोप –
Aishwarya Rai ऐश्वर्या रायने धक्कादायक खुलासे केले होते. तिने सलमानवर शाब्दिक, शारीरिक आणि मानसिक छळवणूक केल्याचा, तसेच भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमान केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर तिने सलमानपासून पूर्णपणे फारकत घेतली.
View this post on Instagram
या कटू प्रकरणानंतर काही वर्षांनी, ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिनेते अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्याशी विवाह केला. २०११ मध्ये या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले, तिचे नाव आराध्या (Aaradhya Bachchan) आहे. ऐश्वर्याने केलेल्या आरोपांवर सलमान खानने कधीही सार्वजनिकरित्या थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोहेल खानची प्रतिक्रिया आणि दावा
सलमान खानने मौन बाळगले असले तरी, त्याचा भाऊ आणि अभिनेता-निर्माता सोहेल खान याने एका जुन्या मुलाखतीत यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्याने ऐश्वर्यावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर काही आरोप केले. सोहेलच्या म्हणण्यानुसार, खान कुटुंबीय ऐश्वर्याला नेहमी आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते आणि ती घरी नेहमी येत-जात असे.
सोहेलने दावा केला की, ऐश्वर्याने सलमानसोबतच्या तिच्या नात्याला कधीही जाहीरपणे स्वीकारले नाही. “आज ती लोकांसमोर रडते, पण जेव्हा ती आमच्या घरी कुटुंबासारखी वावरत होती, तेव्हा तिने कधी नात्याची कबुली दिली का? कधीच नाही,” असे सोहेल म्हणाला होता. त्याच्या मते, ऐश्वर्याच्या या गुप्ततेमुळे सलमानला असुरक्षित वाटत होते, कारण त्याला तिच्याकडून नात्याबद्दल स्पष्टता आणि वचनबद्धतेची खात्री हवी होती, जी ऐश्वर्याने कधीच दिली नाही.






