Smriti Mandhana | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये दोन्ही कुटुंबीय एकत्र दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांचे लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा होती. सांगलीमधील फार्महाऊसवर लग्नाची तयारीही करण्यात आली होती आणि प्री-वेडिंग कार्यक्रमही पार पडले होते. मात्र लग्नाच्या काही तास आधीच हा सोहळा अचानक रद्द झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले.
व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा पुन्हा रंगली :
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पलक मुच्छल आणि तिचे पती Mithun Sharma हे Smriti Mandhana यांच्या वडिलांसोबत दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेरचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये पलक मुच्छल स्मृतीच्या वडिलांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसते. (Smriti Mandhana Wedding)
View this post on Instagram
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली. काही युजर्सच्या मते, दोन्ही कुटुंबांमधील मतभेद मिटले असावेत आणि स्मृती व पलाश पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Smriti Mandhana | व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया :
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जणांच्या मते हा व्हिडिओ खरा नसून जुना असू शकतो, तर काही जणांनी तो बनावट असल्याचाही दावा केला आहे. अद्याप या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मात्र एवढे नक्की की, या व्हिडिओमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत नेमके काय घडते, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






