तुमच्याकडे Google Pixel 9 Pro फोन आहे का?, असेल तर आत्ताच ‘ही’ बातमी वाचा

On: January 30, 2025 5:54 PM
Smartphone Google Pixel 9 Pro Camera Design Flaw Users Complain About Condensation And Detached Back Panel
---Advertisement---

Smartphone | Google आपले स्मार्टफोन (Smartphone) पिक्सल (Pixel) नावाने बाजारात सादर करते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये (August) कंपनीने Pixel 9 ही फ्लॅगशिप सीरिज (Flagship Series) जगभरात सादर केली होती. यात स्टँडर्ड (Standard), प्रो (Pro) आणि एक्सएल (XL) असे तीन मॉडेल्स (Models) आले होते. या फोन्सच्या कॅमेरा सेटअपचे (Camera Setup) भरपूर कौतुक टेक विश्वात (Tech World) पाहायला मिळाले. परंतु आता हाच कॅमेरा सेटअप काही युजर्सच्या (Users) डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

यावेळी कंपनीने कॅमेरा बारच्या (Camera Bar) डिझाईनमध्ये (Design) बदल केला आहे, जे आधीच्या मॉडेल्सप्रमाणे दोन कडांना जोडले जात नाही. Google Pixel 9 Pro च्या डिझाईनमधील दोष समोर आला आहे. काही युजर्सनी कॅमेरा लेन्समध्ये (Camera Lens) वाफ (Condensation) जमा झाल्याची आणि कॅमेरा बार बॅक पॅनलपासून (Back Panel) वेगळा झाल्याची तक्रार केली आहे. अशा दोन घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही वेळा फक्त प्रो मॉडेलमध्ये समस्या दिसून आली आहे.

Pixel 9 Pro चा कॅमेरा बार निघतोय बाहेर

काही मीडिया रिपोर्टनुसार, एका Reddit युजरने (Reddit User) Pixel 9 Pro चा कॅमेरा बार बॅक पॅनलमधून बाहेर येत असल्याचे फोटो पोस्ट केले होते. आता ही पोस्ट हटवण्यात (Deleted) आली आहे. पण त्याआधी समोर आलेल्या फोटोनुसार बॅक पॅनल आणि कॅमेरा बारमध्ये गॅप दिसत आहे. ज्यामुळे धूळ (Dust) आणि पाणी (Water) आत जाऊ शकते, यामुळे IP68 रेटिंगचा (IP68 Rating) दावा फोल ठरतो. (Smartphone)

युजरनुसार, त्याचा Pixel 9 Pro तीन महिने जुना होता आणि त्याने केस (Case) आणि स्क्रीन गार्ड (Screen Guard) वापरून फोन सुरक्षित ठेवला होता. अगदी काळजीपूर्वक हा फोन वापरला होता आणि कधी पडला किंवा आपटला नव्हता. तरी देखील ही समस्या आता समोर आली आहे.

Google कडून निराशाजनक उत्तर

युजरने हे प्रकरण Google च्या ग्राहक मदत केंद्राला (Customer Support Center) कळवले आहे, परंतु योग्य प्रतिक्रिया मिळाली नाही. Google ने म्हटले आहे की फोन 90 दिवस जुना आहे आणि त्यामुळे बदलून देता येणार नाही. पिक्सल फोन 1 वर्षाच्या वॉरंटीसह (Warranty) येतात. तसेच काही समस्या आल्यास फोन 15 दिवसांत बदलून देखील घेता येतो.

याआधी देखील अशीच घटना घडली होती ज्यात Pixel 9 Pro चा कॅमेरा बार निखळला होता. त्यामुळे Pixel 9 Pro च्या डिझाईनमध्ये दोष असल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही Pixel 9 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कॅमेरा बार सुरक्षित राहील याची काळजी घ्या. सध्या भारतात पिक्सल 9 प्रो ची किंमत 1,09,999 रुपये आहे. (Smartphone)

थोडक्यात, Google Pixel 9 Pro च्या कॅमेरा डिझाईनमध्ये काही त्रुटी आढळल्या असून, युजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. Google ने या समस्येची दखल घेऊन योग्य ती पावले उचलणे गरजेचे असल्याचे यूजर्स म्हणत आहेत.

Title : Smartphone Google Pixel 9 Pro Camera Design Flaw Users Complain About Condensation And Detached Back Panel

 

Join WhatsApp Group

Join Now