Skincare | सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःची काळजी घेणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे केसांसोबतच आपली त्वचा देखील निस्तेज दिसू लागते. अगदी मूलभूत गोष्टींसाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही आणि आपण एखादे स्किन केअर रूटीन पाळत असलो तरीही ते आपण नीट पाळत नाही. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा आणि चेहरा स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, हे देखील आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. (Skincare)
चेहरा व्यवस्थित स्वच्छ न केल्यास मुरुम आणि पुटकुळ्यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा आपण एकतर कमी वेळा किंवा जास्त वेळा आपला चेहरा धुतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, म्हणून या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्वचा खराब होण्यापासून वाचवता येईल.
दिवसातून किती वेळा चेहरा धुणे गरजेचे?
दिवसातून दोनदा चेहरा धुणे गरजेचे आहे – सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ केला तर त्वचा उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होईल. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी देखील चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे, जेणेकरून दिवसभरातील धूळ आणि मेकअप निघून जाईल. यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे गरजेचे आहे. जर तुमचा चेहरा दिवसा तेलकट होत असेल तर तुम्ही तुमचा चेहरा आणखी एकदा धुवू शकता.
चेहरा धुताना घ्या ‘ही’ काळजी:
चेहरा धुताना तुम्ही कोणता फेसवॉश किंवा कोणते क्लिंजर वापरत आहात याची विशेष काळजी घ्या. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारच फेसवॉश किंवा क्लिंजरचा वापर करा. जर यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडली नाही तर तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ होणार नाही. चेहरा धुतल्यानंतर नेहमी टोनर आणि मॉइश्चरायझरचा वापर करा. (Skincare)
जर तुम्ही टोनर वापरत नसाल तर ठीक, पण मॉइश्चरायझर लावणे अत्यंत महत्वाचे आहे. स्क्रबयुक्त किंवा दाणे असलेले फेसवॉश वापरणे टाळा, कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. फेसवॉश नेहमी ओल्या चेहऱ्यावर लावा आणि तो त्वचेवर २० ते ३० सेकंदांसाठी हलक्या हाताने चोळा, यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
Title : skincare tips how many times to wash face in a day






